गोव्यात दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू, तर ४५६ नवीन कोरोनाबाधित

पणजी – गोव्यात ९ जून या दिवशी कोरोनाबाधित १६ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे एकूण मृतांची सख्या २ सहस्र ८७७ झाली आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ३ सहस्र १५७ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ४५६ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण १४.४४ टक्के आहे. दिवसभरात ५४९ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित ५७ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटून ५ सहस्र ७९० झाली आहे, तर आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ६० सहस्र ७४० झाली आहे.