भारतात ‘राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य’ कायदा लागू करायला हवा ! – चेतन जनार्दन, हिंदु जनजागृती समिती

प्रतिकात्मक छायाचित्र

‘अनफोल्डिंग’ संस्थेने ५० सहस्र गावे दत्तक घेतली असून तेथील १ लाख लोकांचे धर्मांतर झाले आहे. भारतात ‘सेक्युलॅरिझम’च्या (धर्मनिरपेक्षतेच्या) नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन होत आहे. सरकारकडे या संस्थेची अधिकृत नोंदणी होती का ? अशी नोंदणी नसेल, तर ही विदेशी संस्था इकडे येऊन कार्य कसे करू शकते ? कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करून हे धर्मांतर केले जात आहे. हे जाणून घेऊन सरकारने हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या संस्थांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी. केवळ हीच संस्था नव्हे, तर अमेरिकेतील ६७ विविध संस्था भारतात धर्मांतराचे कार्य करत आहेत. अशा सर्व संस्थांना रोखण्यासाठी ‘नॅशनल फ्रिडम ऑफ रिलिजन बिल’ (राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा) लागू करायला हवा.