कारागृहातील ढिसाळ सुरक्षायंत्रणा !
सावंतवाडी – येथील जिल्हा कारागृहाच्या अंतर्गत असलेल्या कोलगाव येथील आय.टी.आय.च्या इमारतीत तात्पुरत्या स्वरूपात निर्माण करण्यात आलेल्या कारागृहातील आरोपी प्रमोद परब २४ मे या दिवशी पहाटे पसार झाल्याचे उघड झाले.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सावंतवाडी येथील जिल्हा कारागृहातील काही आरोपींना कोलगाव येथील तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. आरोपी परब हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी कारागृहात होता. परब हा पडवे, कसाल येथील असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी दिली.