नवी देहली – कोरोनाच्या दुसर्या लाटेत देशभरात ४२० डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनने दिली आहे. यांतील १०० डॉक्टर एकट्या देहलीमधील आहेत. याव्यतिरिक्त बिहारमध्ये ९६, उत्तरप्रदेशात ४१, आंध्रप्रदेशमध्ये २६, महाराष्ट्रात १५, मध्यप्रदेशात १३, गुजरातमध्ये ३१ आणि अन्य राज्यांतही डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.