कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने सामाजिक कार्यकर्त्याची आत्महत्या

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा – सातारा तालुक्यातील माळ्याचीवाडी येथील असंघटित कामगारांसाठी कार्यरत असणारे नंदकुमार केसकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कोरोना चाचणी सकारात्मक आल्याने नैराश्यातून त्यांनी असे केल्याचे समजते.

केसकर हे नळ दुरुस्ती कारागीर होते. स्वत:चा उद्योग संभाळत ते असंघटित कामगारांसाठी आणि समाजासाठी कार्य करत होते. त्यांनी अनेक असंघटित कामगारांच्या नोंदी करून त्यांना विविध सहाय्य केले होते. ८ दिवसांपूर्वी त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यामध्ये ते ‘पॉझिटिव्ह’ आले. पुन्हा दुसरी चाचणी केली. त्यामध्ये ते ‘निगेटिव्ह’ आले. नंतर पुन्हा चाचणी केली त्यामध्ये ते ‘पॉझिटिव्ह’ आले. त्यामुळे नैराश्यामध्ये जाऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.