७ वर्षीय बालिकेवर धर्मांतरासाठी दबाव टाकणार्‍या २ ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या विरोधात पोलिसात तक्रार !

तामिळनाडू राज्यातील इरोड जिल्ह्यात हिंदूंच्या धर्मांतराच्या वाढत्या घटना !

ख्रिस्ती धर्मप्रसारकांवर आळा घालायचा असेल, तर भारतभर धर्मांतरविरोधी कायदा लागू करणे अपरिहार्य ! तमिळनाडूमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता तेथे परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !

मोडाकुरीची – शहरात एका ७ वर्षीय बालिकेवर धर्मांतरासाठी दबाव टाकणार्‍या २  ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

उषा राणी आणि वर्जिनिया अशी या महिलांनी नावे आहेत. त्यांनी संबंधित मुलीला चर्चमध्ये बोलावून ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यास सांगितले. मुलगी धर्मांतर करण्याला सिद्ध होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर ‘धर्मांतर न केल्यास तुझे पालक आजारी पडून त्यांचा मृत्यू होईल आणि ते भुतांच्या कह्यात जातील’, अशी भीती या महिलांनी मुलीला दाखवली. वाढत्या दबावामुळे तणावाखाली आलेल्या मुलीने तिच्या पालकांना सविस्तरपणे घडलेले सर्वकाही सांगितले. त्यानंतर पालकांनी हिंदु मुनानी या संघटनेचे साहाय्य घेऊन पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

तमिळनाडूतील शाळा बनत आहेत धर्मांतराचे अड्डे !

विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खात्यांतर्गत कारवाई !

याच मतदारसंघात मागील वर्षी ऑक्टोबर मासात सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि एक शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार करण्यात आली होती. (सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शिक्षिका मुलांचे धर्मांतर करण्यास गुंतल्या असतील, तर तेथील हिंदु मुलांचे भवितव्य किती अंधारमय आहे, हे आपल्या लक्षात येईल ! – संपादक) या शिक्षिकांकडे ख्रिस्ती पंथाची धार्मिक पुस्तके, ध्वनीचित्रचकत्या, हस्तपत्रके आणि विद्यार्थ्यांना अमिष दाखवण्यासाठी खेळणी आढळून आली होती. त्यानंतर झालेल्या चौकशी अंती त्यांच्यावर खातेअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रसंगात भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि हिंदु मुनानी यांनी मिळून तक्रार केली होती.