‘म्युकोरोमायकॉसिस’च्या उपचारासाठी राज्यातील विविध संघटना आणि संस्था यांच्याकडून आदर्श कार्यप्रणाली विकसित

‘म्युकोरोमायकॉसिस’

पुणे – ‘म्युकोरोमायकॉसिस’ या बुरशीजन्य आजाराच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या अनेक संघटना आणि संशोधन संस्था यांनी आदर्श कार्यप्रणाली (एस्.ओ.पी.) विकसित केली आहे. रुग्णाचे जलद निदान व्हावे आणि त्याला योग्य शास्त्रीय उपचार मिळावेत, यासाठी ही कार्यप्रणाली सिद्ध केली आहे. पुणे अ‍ॅप्थॉल्मिक सोसायटी आणि महाराष्ट्र अ‍ॅप्थॉल्मिक सोसायटी या आजारासंदर्भातील कार्यप्रणाली सिद्ध करत आहेत.

पुण्यातील नेत्ररोग तज्ञ आणि संशोधक डॉ. नताशा पहुजा यांनी म्हटले आहे की, ‘म्युकोरोमायकॉसिस’ हा दुर्मिळ आजार असल्यामुळे उपचारांमध्ये सुसूत्रता येण्यासाठी या कार्यप्रणालीचा उपयोग होईल. राज्यातील डॉक्टरांच्या संघटनांसह डोळ्यांसाठीची सर्वांत मोठी संस्था समजल्या जाणार्‍या एल्.व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट यांनीही आदर्श कार्यप्रणाली विकसित केली आहे. जवळपास सर्व कार्यप्रणाली सारख्याच आहेत.