नामजपाचे सतत स्मरण व्हावे यासाठी आपल्या नजरेसमोर देवतेच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे उपयुक्त ठरते. सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्याांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात. बर्याचदा वास्तूचे किंवा वास्तूतील खोलीचे छत हे उतरते असते, म्हणजेच भूमीच्या पातळीशी समांतर नसते. इमारतींमधील खोल्यांच्या संदर्भात कौलारू घरांच्या संदर्भात ही शक्यता अधिक असते. यामुळे वास्तूत अयोग्य स्पंदने सिद्ध होतात. यावर उपाय म्हणून देवतांच्या नामपट्ट्या खोलीतील बाजूच्या भिंतींवर अशा प्रकारे एका रेषेत लावाव्यात की, त्या नामपट्ट्यांमुळे भूमीच्या पातळीशी समांतर असे सूक्ष्मातील छत निर्माण होईल. नामपट्ट्यांतून निघणार्या चैतन्यलहरी अधिक प्रमाणात भूमीला समांतर आणि समोर जात असल्यामुळे हे सूक्ष्म-छत सिद्ध होते. यामुळे वास्तूत चांगली स्पंदने निर्माण होतात आणि वास्तूचे रक्षण होते. खाली दिलेल्या आकृत्यांवरून हे अधिक लक्षात येईल.
- घराच्या भिंती पूर्व, पश्चिम आदी मुख्य दिशांना समांतर नसून आग्नेय, नैऋत्यादी उपदिशांना समांतर असल्यास दोन भिंतींच्या मध्यभागी दोरी लावून नामपट्ट्यांद्वारे वास्तू-छत सिद्ध करावे.
- कौलारू घरांप्रमाणे बर्याचदा वास्तूचे किंवा वास्तूतील खोलीचे छत हे भूमीशी समांतर नसल्याने वास्तूत अयोग्य स्पंदने निर्माण होतात. यावर उपाय म्हणून देवतांच्या नामपट्ट्या प्रत्येक खोलीच्या भिंतींवर एका रेषेत लावाव्यात. यामुळे नामपट्ट्यांतून निघणार्या चैतन्यलहरी भूमीला समांतर आणि समोर जात असल्यामुळे वास्तूत सूक्ष्म-छत निर्माण होऊन वास्तूचे रक्षण होते. नामपट्ट्या लावतांना दोन पट्ट्यांमधील अंतर १ मीटरपेक्षा अधिक असू नये.
|