कराड, १३ मे (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शासनाला सहकार्य करण्यासाठी निःस्वार्थी भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रस्त्यावर उतरला आहे.
संघाच्या सामाजिक बांधिलकीवर राष्ट्रीय युवक काँग्रेसने घेतलेला आक्षेप निषेधाहर्र् आहे, अशी टीका भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केली.
युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात संघाचे कार्यकर्ते सेवा करत असतांना त्यांच्यावर विविध आरोप केले होते. याला प्रतीउत्तर देतांना विक्रम पावसकर म्हणाले, ‘कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात प्रशासनाची अनुमती घेऊन संघाचे स्वयंसेवक लसीकरण केंद्रावर ३ दिवस कार्यरत होते. तेथे त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून गदी नियंत्रणात आणली, जेष्ठ नागरिकांना नावनोंदणीसाठी सहकार्य केले. तसेच रुग्णालय प्रशासनाला सहकार्य केले; मात्र काही राजकीय पुढारी संघाची मानहानी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. नि:स्वार्थी सेवाकार्य थांबवण्याच्या उद्देशाने संघाला लक्ष केले जात आहे.