उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. स्वराली पांढरे ही एक आहे !
(‘वर्ष २०१६ मध्ये कु. स्वराली हिची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)
१. वय ३ ते ४ वर्षे
१ अ. समंजस : ‘आम्ही पनवेलमध्ये स्थायिक झाल्यावर वर्ष २०१६ मध्ये मी रुग्णालयात सेवेला जाऊ लागले. त्यानंतर काही दिवस मी कामावर जातांना ती रडायची आणि मला ‘जाऊ नकोस’, असे म्हणायची. नंतर मी तिला समजावून सांगितले. त्यानंतर ती न रडता घरी थांबू लागली.
१ आ. इतरांना साहाय्य करणे : ‘स्वराली सर्वांना साहाय्य करते’, असे तिच्या मैत्रिणीची आई आणि शाळेतील शिक्षिका सांगतात अन् तिचे कौतुक करतात. तिची एक मैत्रीण प्रकृतीने किरकोळ असल्याने स्वराली तिची बॅग स्वतः उचलून तिच्या पालकांना नेऊन द्यायची. ती तिच्या सर्व मैत्रिणींची लहान बहिणीसारखी काळजी घेत असे.
१ इ. जवळीक करणे : स्वराली पुष्कळ बोलकी आहे. ती लहान आणि मोठे यांच्यामध्ये पटकन मिसळते. त्यामुळे घराजवळची सर्व मुले तिच्याशी खेळायला येतात.
२. वय ४ ते ५ वर्षे
२ अ. स्वावलंबी : ‘मला दैनंदिन कृती करतांना त्रास होतो’, हे समजल्यावर ती स्वतःची वैयक्तिक कामे स्वतःच करू लागली. मी २ मास माहेरी राहिले होते. तेव्हा ती शाळेचा अभ्यास स्वतः करायची. या वेळी तिने आजी-आजोबा आणि तिचे बाबा यांना जराही त्रास दिला नाही.
२ आ. कुशाग्र बुद्धी : तिला अभ्यास किंवा एखादा श्लोक एकदा सांगितला की, ती त्वरित आत्मसात करते आणि चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवते. ती शाळेत प्रत्येक स्पर्धेत उत्साहाने भाग घेते. तिला शाळेत उत्कृष्ट विद्यार्थिनी म्हणून पारितोषिक मिळाले होते.
ती गाणे, एकांकिका, नृत्य या कला सफाईदारपणे आत्मसात करून आत्मविश्वासाने सादर करते आणि प्रत्येक वेळी पारितोषिकमिळवते.
३. वय ५ ते ६ वर्ष
अ. ती सतत हसतमुख असते.
आ. सध्या कोरोना महामारीमुळे स्वराली तिच्या आजीकडे सांगलीला आली आहे. तिला घरी लहान लहान कामे सांगितली की, ती आनंदाने करते, उदा. धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करणे, जेवणानंतर लादी पुसून घेणे.
इ. तिला पारंपरिक पोषाख घालायला, तसेच तिला साडी नेसायला, हळदी-कुंकू लावायला आणि बांगड्या घालायला आवडते.
४. स्वभावदोष
राग येणे, हट्टीपणा, उतावळेपणा आणि अपेक्षा करणे
‘गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळे स्वरालीची गुणवैशिष्ट्ये आणि स्वभावदोष लक्षात आले अन् तुम्हीच माझ्याकडून लिहून घेतले, तरी आपल्याचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. स्नेहश्री संतोष पांढरे (आई), पनवेल (२६.५.२०२०)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.