उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. संभव योगेश धनावडे हा या पिढीतील एक आहे !
मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा (१६.१२.२०२४) या दिवशी कु. संभव योगेश धनावडे याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सौ. कल्याणी धनावडे (कु. संभवची काकू) यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !
‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कु. संभव धनावडे याला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. वय – १ ते ५ वर्षे
१ अ. समंजसपणा : ‘कु. संभव २ ते ३ वर्षांचा असल्यापासून माझ्याकडेच रहायचा. त्याची आई सकाळी ९ वाजता शेतात जायची आणि संध्याकाळी ६ वाजता परत यायची. त्या वेळी संभवने मला कधीच त्रास दिला नाही.
१ आ. नामजपादी उपाय करणे : संभव ४ ते ५ वर्षांचा असतांना त्याचे काका श्री. संतोष धनावडे नामजप करायला बसले की, तोसुद्धा त्याच्या खोलीत जाऊन नामजप करायला बसायचा. एक दिवस त्याने काकांना उदबत्तीने त्रासदायक आवरण काढतांना पाहिले. तेव्हा त्यानेही स्वतःवरील आवरण काढले.
२. वय – ५ ते १० वर्षे
२ अ. त्याला देवपूजा करायला आवडते. तो सकाळी उठल्यावर ‘देवाची पूजा करण्याची वेळ होण्याची वाट पहात असे.
३. वय १० – ११ वर्षे
अ. संभव लहान-मोठे सर्वांच्या समवेत सहजतेने जुळवून घेतो. तो शाळेतील सर्व मुले आणि शिक्षक यांचा आवडता आहे.
आ. तो बुद्धीमान असून शाळेतील आदर्श विद्यार्थी आहे; म्हणून सर्व शिक्षक त्याचे कौतुक करतात.
३ ई. देवाची आवड : तो शाळेतून घरी आल्यावर स्नान करून देवापुढे दिवा लावतो आणि घरात सगळीकडे धूप फिरवतो. नंतर तो भावंडांच्या समवेत स्तोत्र म्हणतो. तो कुलदेवता, दत्तगुरु आणि श्रीकृष्ण यांचा नामजप करतो.
३ उ. मांसाहार सोडून शाकाहारी जेवणे : एकदा त्याच्या काकांनी त्याला सांगितले, ‘‘मांसाहार तामसिक आहे आणि शाकाहार सात्त्विक आहे.’’ त्यानंतर त्याने मांसाहार करणे सोडले आणि तो शाकाहार करू लागला.
३ ऊ. भक्तीसत्संग आवडीने ऐकणे : तो घरी असतांना इतर मुलांप्रमाणे खेळणे किंवा दूरदर्शन पहाणे यापेक्षा भ्रमणभाषवर सनातन संस्थेने प्रक्षेपित केलेले भक्तीसत्संग ऐकतो. त्या वेळी कुणी बाहेर जात असले, तरी तो त्यांच्या समवेत जात नाही.
४. जाणवलेले पालट
कु. संभवची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धा आणि देवाविषयीची ओढही वाढली आहे.
परात्पर गुरु डॉक्टर, आपणच त्याच्याकडून साधना करून घेत आहात. संभवविषयीची सूत्रे माझ्याकडून लिहून घेतल्याबद्दल मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे.’
– सौ. कल्याणी धनावडे (कु. संभवची काकू), नाचणे, जि. रत्नागिरी.