जागतिक आरोग्य संघटनेचा ‘इव्हमेक्टिन’ औषध न घेण्याचा नागरिकांना सल्ला

गोवा शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘इव्हमेक्टिन’ औषधाला मान्यता दिल्याचे प्रकरण

पणजी – जागतिक आरोग्य संघटनेने ११ मे या दिवशी सर्वसामान्य नागरिकांनी ‘इव्हमेक्टिन’ औषध न घेण्याचा सल्ला दिला आहे. हे औषध कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरले जाते. गोवा शासनाने कोरोनामुळे होणारा मृत्यूदर अल्प करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ‘इव्हमेक्टिन’ औषधाला मान्यता देण्याचा निर्णय १० मे या दिवशी घेतला होता.

या पार्श्‍वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन ट्वीट करून म्हणाल्या, ‘‘कोरोनावरील नवीन लक्षणांसाठी कोणतेही औषध वापरण्याआधी त्याची क्षमता आणि सुरक्षितता जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही चाचण्यांशिवाय कोरोनाच्या वापरासाठी ‘इव्हमेक्टिन’ औषध वापरण्यास मान्यता देत नाही.’’