कृतज्ञता, अमावास्या तुजप्रती !

श्री. महावीर श्रीश्रीमाळ

‘१२.३.२०२१ या दिवशी मला सकाळी आवरतांना वातावरणात जडपणा जाणवत होता. तेव्हा १३.३.२०२१ या दिवशी अमावास्या असल्याचे लक्षात येऊन मला पुढील ओळी सुचल्या.

वातावरणातील रज-तमासह ।
आध्यात्मिक त्रास वाढती ।। १ ।।

नामजपादी उपायांचे होते स्मरण ।
वाढे अमुची शरणागती ।। २ ।।

एक पाऊल साधनेत पुढे पडते ।
हे अमावास्ये कृतज्ञता तुजप्रती ।। ३ ।।

या तिथीस प्रकटली श्रीसत्शक्ति (टीप) । हे अमावास्ये कृतज्ञता तुजप्रती’ ।। ४ ।।

टीप : ​श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ. त्यांचा जन्म सर्वपित्री अमावास्येला झाला आहे.

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२१)