वडिलांचे देहावसान झाल्यानंतरही स्थिर राहून इतरांचा विचार करणार्‍या आणि सेवेची तीव्र तळमळ असलेल्या रामनाथी आश्रमातील कु. योगिता पालन !

कु. योगिता पालन

१. वडिलांचे देहावसान झाल्यानंतर अंत्यविधीसाठी घरी गेल्यावर आठवणीने सेवेचा निरोप देणे

​‘तुकारामबीज, ३०.३.२०२१ या दिवशी दुपारी कु. योगिता पालन यांच्या वडिलांचे देहावसान झाले. त्यामुळे त्याआश्रमातून फोंडा येथील त्यांच्या घरी अंत्यविधीसाठी गेल्या. त्या वेळी योगिताताईंना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनाएक संहिता द्यायची होती. दुपारी ४.४५ वाजता योगिताताईंनी मला कु. वैष्णवी वेसणेकर यांच्याकडून ती संहिता मागवून त्याची प्रत (प्रिंट) काढून देण्याचा संदेश पाठवला.

२. रात्री ११ वाजता लघुसंदेश पाठवून सेवा पूर्ण झाल्याची निश्चिती करून घेणार्‍या योगिताताईंची सेवेची तळमळ आणि अन्यगुण ध्यानी येणे

त्यानंतर रात्री ११ वाजता त्यांनी लघुसंदेश पाठवून ‘प्रत दिली का ?’, याची निश्चिती केली. वास्तविक पहाता त्यांनी मला सेवा सांगितल्या नंतर कु. वैष्णवी ताईंच्या संपर्कात राहून ती सेवा पूर्ण करण्याचे दायित्व माझ्यावर होते. विशेषतः वडिलांच्या अंत्यविधीसाठी घरी गेल्यानंतर मी योगिताताईंना सेवेसाठी संपर्क करणे किंवा त्यांनी मला सेवेची आठवण करणे, हे अपेक्षित नव्हते.

​घरी दुःखद प्रसंग घडला असतांनाही योगिताताईंची सेवेची तळमळ, परिपूर्ण सेवेचा ध्यास, स्थिरता आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्यासह अन्य साधकांचा विचार आदी गुण माझ्या लक्षात आले.

​सुखद किंवा दुःखद प्रसंग घडत असतांना त्यामध्ये न अडकता सेवा आणि साधना यांचा विचार करून योग्य कृती करण्यासाठी योगिताताईंची ही कृती आम्हा सर्व साधकांना प्रेरक ठरेल. याविषयी परात्पर गुरुदेवांच्या चरणी

कृतज्ञता !’

– श्री. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०२१)