उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर आणि कु. प्रियांका गुरुदास गुंजेकर या आहेत !
चैत्र कृष्ण पक्ष एकादशी, म्हणजेच वरुथिनी एकादशी (७.५.२०२१) या दिवशी कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
(वर्ष २०१८ मध्ये कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के होती.)
कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. वागण्या-बोलण्यातील सहजता
‘कु. श्रियाच्या वागण्या-बोलण्यात पुष्कळ सहजता आहे. ती सहजतेने सर्व वयोगटांतील साधक आणि नातेवाईक यांच्या मध्ये मिसळते. ती जितक्या सहजतेने नातेवाइकांशी बोलते, तितक्याच सहजतेने साधकांशी आणि परिचितांशी बोलते. तिच्यातील या सहजतेमुळे ती सर्वांना लगेचच आपलीशी वाटते.
२. प्रत्येकच कृती मनापासून करणे
ती प्रत्येक कृती नीटनेटकेपणे आणि भावपूर्ण करते. मग ती एखादी सेवा असेल, खेळण्यांशी खेळणे असेल, अभ्यास असेल, मला घरातील कामात साहाय्य करणे असेल किंवा पू. वामन यांच्या समवेत खेळणे असेल. ती सर्वच कृती मनापासूनआणि भावपूर्ण करते. त्याचा परिणाम म्हणूनच कि काय तिच्या तोंडवळ्यावर कधी थकवा जाणवत नाही.
३. अलिप्तता असणे
श्रियामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. तिचे सर्वांशीच वागणे-बोलणे सहज आणि आपुलकीचे असते; परंतु ती कधीच कुठल्याही गोष्टींत, व्यक्तींत किंवा प्रसंगांत अडकत नाही. श्रियामधील हा अलिप्तपणा अलीकडच्या काळात पुष्कळच वाढलाआहे.
४. स्थिरता
श्रियामध्ये प्रचंड ‘स्थिरता’ आहे. ती कुठल्याही परिस्थितीत अस्थिर होत नाही. तिच्या मनाची स्थिरता तिच्या तोंडवळ्यावर स्पष्ट दिसून येते. आम्ही तिला कुठल्याही प्रतिकूल प्रसंगात अस्थिर झालेले बघितले नाही. त्याचप्रमाणे तिचे संतांनी कौतुक केले किंवा आमच्या आनंदाच्या प्रसंगांतही ती तेवढीच स्थिर असते. तिच्यामध्ये कधी उतावळेपणा किंवाअतीउत्साह जाणवत नाही. ‘श्रियामधील स्थिरता ही तिच्या अंतर्मनातून आहे’, असे जाणवते. तिच्या सहवासात असतांना आम्हालाही आपोआपच स्थिरता आणि शांतता जाणवते.
५. अल्प अहं
अ. एखाद्या प्रसंगात संत तिचे कौतुक करतात. त्या वेळीसुद्धा ती त्या कौतुकात अडकत नाही किंवा त्याविषयी पुन्हा काहीबोलत नाही.
आ. श्रियाला इतरांकडून कसल्याही अपेक्षा नसतात. त्यामुळे कुणी तिच्याशी चुकीचे वागल्यास तिला त्याचा त्रास वाटत नाहीआणि ती त्याचा विचारही करत नाही.
६. सतत अनुसंधानात असणे
श्रियाकडे पहातांना ‘तिच्या बाह्य किंवा स्थुलातील कृतींपेक्षा ती देवाच्या अनुसंधानात आहे’, असे जाणवते. त्यामुळे ती खेळत असतांनाही आपण साधनेविषयी काही विचारले, तर ती योग्य दृष्टीकोन सांगते आणि पुन्हा खेळायला लागते. श्रियाने सांगितलेला दृष्टीकोन इतका योग्य आणि तत्त्वाला धरून असतो की, तो ऐकून आम्हाला आश्चर्य वाटते. तिला ‘‘तुलाहे कुणी शिकवले ?’’, असे विचारल्यावर ती ‘‘देवाने शिकवले’’, असे सहजतेने सांगते. श्रियामध्ये देवाप्रती पुष्कळ भाव आहे.
७. संतांप्रती असलेला अपार भाव
७ अ. लहान भाऊ पू. वामन यांच्याकडे संत या भावाने पहाणे : श्रिया पू. वामन यांच्याकडे लहान भाऊ म्हणून बघते आणि त्याच वेळी ‘ते संत आहेत’, याचीही तिला जाणीव असते. त्यामुळे पू. वामन यांच्याशी खेळतांनाही ती त्यांच्याकडून शिकण्याच्या आणि भावाच्या स्थितीत असते, उदा. कधी खेळतांना पू. वामन आणि श्रिया भातुकली खेळतात. तेव्हा पू. वामन श्रियाला खायला खोटा खोटा खाऊ बनवून देतात. त्या वेळी श्रिया तो खोटा खोटा खाऊही प्रार्थना करून ग्रहण करते आणित्यांचे कौतुक करून ‘या खाऊमधून मला पुष्कळ चैतन्य आणि शक्ती मिळाली’, असे सांगते.
७ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी असलेला अपार भाव !
७ आ १. चारचाकी गाडीतून विमानतळापर्यंत जातांना ‘ती चारचाकी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वापरली आहे’, असे चालक साधकाने सांगणे : काही दिवसांपूर्वी आम्ही बाहेरगावी जात असतांना आश्रमातील एक साधक चारचाकी गाडी घेऊन आम्हाला विमानतळावर सोडायला आले. चालक साधकाने आम्हाला‘या गाडीतून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रवास केला आहे’, असे सांगून त्याने त्या संदर्भातील पुष्कळ अनुभूती सांगितल्या.
७ आ २. पुष्कळ झोपेत असूनही सीटवर पाय न ठेवता केवळ डोके टेकवून झोपणे : काही दिवसांनी आम्ही बाहेरगावाहून गोव्याला परत आल्यावर तीच चारचाकी गाडी घेऊन दुसरे चालक साधक आम्हाला घ्यायला विमानतळावर आले. अनेकअ डचणींमुळे विमानाला नियोजित वेळेपेक्षा पुष्कळ उशीर झाला. विमान पहाटे ३.०० वाजता गोव्यात पोचले. मी पू. वामनयांना घेऊन समोरच्या सीटवर बसले आणि ‘श्रियाला घरी पोचेपर्यंत झोपता यावे’; म्हणून तिला मागच्या सीटवर बसवले. पहाटे ३.०० ची वेळ असल्याने श्रियाला पुष्कळ झोप येत होती. चालक साधकाने तिला ‘‘तू सीटवर आरामात पाय लांब करून झोप’’, असे सांगितले. श्रियाने पायातील बूट काढून ठेवले; परंतु सीटवर पाय ठेवले नाहीत. ती फोंडा येथे घरी पोचेपर्यंत १ घंटा केवळ सीटवर डोके ठेवून झोपली होती.
७ आ ३. संत बसलेल्या सीटवर पाय ठेवून न झोपता ‘त्यांच्या मांडीवर डोके टेकवून झोपूया’, असा विचार अन् भाव असलेलीश्रिया ! : दुसर्या दिवशी मी श्रियाला त्याविषयी विचारले. तेव्हा श्रिया म्हणाली, ‘‘आई, त्या गाडीत सद्गुरु बिंदामावशी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) आणि सद्गुरु काकू (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) मागच्या सीटवर बसतात. मगत्या सीटवर मी पाय कशी ठेवणार ? ‘मी सद्गुरु बिंदामावशी यांच्या मांडीवर डोके ठेवून झोपले आणि सद्गुरु काकूंनी मलाधरून ठेवले होते. त्यामुळेच मी झोपेत असूनही गाडीत पडले नाही.’’ तिचे हे बोलणे ऐकल्यावर मी निःशब्दच झाले.
७ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन करतांना त्यांच्याप्रती भाव ठेवून वागणारी श्रिया ! : एकदा श्रिया परात्पर गुरुडॉक्टरांच्या खोलीत गेली होती. त्या वेळी त्यांनी श्रियाला आणि तिच्या समवेत असणार्या साधिकेला त्यांच्या खोलीतील‘ आरशात बघून काय जाणवते ?’, हा प्रयोग करायला सांगितला. त्या वेळी श्रियाने काही क्षण आरशात बघितले आणि तिने‘काय जाणवले ?’, ते परात्पर गुरु डॉक्टरांना सांगितले. नंतर श्रियाने मला हा प्रसंग सांगितला. ती मला म्हणाली, ‘‘आई, तेआपले गुरु आहेत ना ? मग आपण त्यांच्या आरशात कसे बघायचे ? शिष्याने असे गुरूंच्या वस्तूकडे बघू नये; पण परमपूज्यांचे आज्ञापालन करण्यासाठी मी क्षणभर आरशात बघितले. त्या वेळी मला आरशात मी न दिसता परात्पर गुरुदेवचदिसले. मी बरोबर केले ना ?’’ तिच्या या उत्तराने तिच्या प्रगल्भतेचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘देवच तिला प्रत्येक क्षणीघडवतो आहे’, याचीच पुन्हा एकदा जाणीव होऊन श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
८. समाजातील लोकांनी लक्षात आणून दिलेली श्रियाची वैशिष्ट्ये
जानेवारी २०२१ मध्ये आम्ही नागपूरला माझ्या माहेरी गेलो होतो. तिथे साधारण एक मासाच्या कालावधीत आमचे काही नातेवाईक आणि काही परिचित यांच्याशी भेटी झाल्या. त्या वेळी साधना न करणारे आणि श्रियाच्या आध्यात्मिक पातळीविषयी काही ठाऊक नसणारे असे काही नातेवाईक अन् आप्तजन आम्हाला भेटले. त्यांनी श्रियाविषयी
सांगितलेली सूत्रे पुढे देत आहे.
अ. श्रियामध्ये पुष्कळ वेगळेपण जाणवते. ती कशाविषयीही कधी तक्रार करत नाही.
आ. ती पुष्कळ प्रेमळ, समजूतदार आणि नीटनेटकी आहे. तिला पाहूनही ते कळते.
इ. ती गोड आवाजात आणि नम्रतेनेच बोलते.
ई. श्रियाचे राहणीमान सात्त्विक आहे. ‘कुंकू, बांगड्या, लांब वेण्या’, असे सर्व आता बघायलाही मिळत नाही.
उ. ‘श्रियाचे बोलणे ऐकतच रहावे’, असे वाटते. तिचे बोलणे हळुवार आणि एका लयीत असते.
ऊ. श्रियाच्या समवेत असतांना पुष्कळ उत्साही आणि आनंदी वाटते. ‘ती आली की, वातावरण हलके होते’, असे वाटते.
ए. श्रियाच्या साधेपणातच तिचे सौंदर्य आहे. गर्दीतसुद्धा पटकन तिच्याकडेच लक्ष वेधले जाते. तिच्याकडे बघितल्यावर देवीचीच आठवण येते. ‘तिच्याभोवती वलय किंवा प्रकाश आहे’, असे वाटते.
आज समाजातील लोकांकडून श्रियाचे कौतुक ऐकतांना ‘हे तर परात्पर गुरु डॉक्टरांचेच कौतुक करत आहेत’, असे मला वाटले. समाजातील लोकांकडून ‘तुम्ही अतिशय भाग्यवान आहात, तुम्हाला अशी मुलगी आहे’, हे ऐकायला मिळणे’, ही केवळ परात्पर गुरु डॉक्टरांची कृपाच आहे. त्या क्षणी केवळ कृतज्ञताच व्यक्त होते.
(केवळ परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प आणि त्यांची कृपा यांमुळे या दैवी बालकांचा जन्म झालेला आहे. या दैवीबालकांची ही गुणवैशिष्ट्ये इतकी ठळक आणि विशेष आहेत की, ‘आता समाजातील लोकांनासुद्धा ही मुले वेगळी आहेत’, हे जाणवते. यासाठी ‘ही सर्व सूत्रे विशेष आहेत’, असे मला वाटले.’ – सौ. मानसी)
९. प्रगल्भता दाखवणारे श्रियाचे आध्यात्मिक विचार !
९ अ. ‘गुरु हे वेगवेगळे दिसले, तरी तत्त्वतः एकच असतात’, असे सांगत हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवल्याचे सांगूनत्यांचे देवत्व उलगडणारी चिमुरडी श्रिया ! : एकदा आमच्या काही नातेवाइकांमध्ये वेगवेगळ्या संतांविषयी (श्री गजाननमहाराज, स्वामी समर्थ, साईबाबा इत्यादी) चर्चा चालू होती. प्रत्येक जण गुरूं विषयीचे आपापले मत आणि अनुभव सांगत होते. त्या वेळी श्रिया सर्वांना म्हणाली, ‘‘ते सगळे संत दिसायला वेगळे दिसतात; पण गुरुतत्त्व एकच असते. सर्व संत सूक्ष्मातून एकच असतात; म्हणून ते शिकवतात, तेही एकच असते. हे मला आमच्या परम पूज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) शिकवले आहे. ते साक्षात् ईश्वर (नारायण) आहेत; पण ते स्वतः तसे म्हणत नाहीत आणि सांगतही नाहीत; म्हणून तर ते देव आहेत.’’
९ आ. एका संतांच्या आश्रमात आलेले भक्त आणि साधक यांचे बोलणे-वागणे पाहून ‘ते ‘साधक’ नाहीत’, असे सांगणारीश्रिया ! : एकदा आम्ही एका संतांच्या आश्रमात गेलो होतो. तिथे त्यांचे पुष्कळ साधक आणि भक्त आले होते. त्या ठिकाणी सर्वांनी चपला अव्यवस्थितपणे काढल्या होत्या आणि बरेच जण गट करून मोठमोठ्याने गप्पा मारत होते. घरी परत येतांना श्रिया मला म्हणाली, ‘‘आई, आता आपण ज्या आश्रमात गेलो होतो, तिथे आलेले कुणीच ‘साधक’ नव्हते. त्यामुळेच तेथे असा अव्यवस्थितपणा होता. त्यांच्या मनात ‘आपण वागतो आहे, ते आपल्या श्री गुरूंना आवडेल का ?’, हा विचारच नव्हता. ‘श्री गुरूंना काय आवडेल ?’, असा विचार असणारा अयोग्य वागणारच नाही.’’
(क्रमश: वाचा उद्याच्या अंकात)
– सौ. मानसी आणि श्री. अनिरुद्ध राजंदेकर (कु. श्रिया हिचे आई-वडील), फोंडा, गोवा. (११.४.२०२१)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.