अशोक चव्हाण यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे ! – आमदार विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम पक्ष

आमदार विनायक मेटे

मुंबई – आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून ओळखला जाईल. मराठा आरक्षणासाठी अनेक मराठा युवकांनी बलीदान दिले आहे. काँग्रेसेचे नेते अशोक चव्हाण यांना याची जाण असेल, तर त्यांनी ‘मराठा आरक्षण उपसमिती’च्या अध्यक्षपदाचे त्यागपत्र द्यावे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाविषयीची भूमिका घोषित करावी’, अशी मागणीही मेटे यांनी केली.