पुणे येथील तक्रारदाराच्या घरातून घड्याळ चोरणारा पोलीस निलंबित

लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस !

पुणे, १ मे – चहा पिण्याच्या बहाण्याने तक्रारदार तरुणीच्या घरात जावून प्रशांत राजेंद्र रेळेकर या फौजदाराने पर्ल आस्थापनाचे महागडे घड्याळ चोरले. रेळेकर यांच्या वागणुकीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी त्याचे निलंबन केले. याविषयीचे आदेश आयुक्तांनी ३० एप्रिल या दिवशी दिले आहेत. हा प्रकार हिंजवडी परिसरात घडला असून या प्रकरणी एका २५ वर्षीय तरुणीने तक्रार केली आहे. (असे गुन्हेगारी वृत्तीचे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? अशा पोलिसांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक)