५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला जोगेश्वरी, मुंबई येथील चि. दर्श अमित गुळेकर (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. दर्श गुळेकर ही एक आहे !

चि. दर्श गुळेकर

१. सौ. पूर्णता अमित गुळेकर (आई), जोगेश्वरी, मुंबई.

१ अ. बाळाच्या जन्मापूर्वी

१ अ १. पत्रिकेत संतती प्राप्ती नसणे : विवाहापूर्वी आमच्या दोघांच्या पत्रिकेत संतती प्राप्ती नसल्याचे लक्षात आले, तरी प्रारब्धानुसार माझा विवाह त्याच मुलाशी झाला.

१ अ २. चि. दर्शच्या जन्मापूर्वी २ वेळा गर्भपात होणे आणि चि. दर्शच्या वेळीही तशीच स्थिती निर्माण होणे : आमचा विवाह झाल्यावर माझा २ वेळा गर्भपात झाला. ३ र्या वेळी मूल सुखरूप होण्यासाठी आम्ही आधुनिक वैद्यांचा समुपदेश घेतला. त्याप्रमाणे उपचार घेतले आणि मला तिसर्
यांदा दिवस गेले. आधुनिक वैद्यांनी मला ५ मासांपासून ‘बेडरेस्ट’ घ्यायला सांगितले. बाळ पोटात असतांना त्याच्या दोन्ही किडनींना सूज आली होती. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘आताही गर्भपात करावा लागेल. अशा प्रकारचे बाळ आपण ठेवू शकत नाही.’’

१ अ ३. गरोदरपणात आलेल्या अडचणींवर आधुनिक वैद्यांकडून मिळालेला निर्णय : याविषयी आम्ही एका आधुनिक वैद्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘बाळ असू द्या, त्याला काही होणार नाही.’’

१ अ ४. सनातन संस्थेच्या देवद (पनवेल) येथील आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याकडून गर्भाच्या निरोगितेविषयी आणि सुखरूप प्रसुतीविषयी मिळालेले मंत्रोपाय, त्यामुळे झालेले लाभ अन् आलेल्या अनुभूती

अ. गरोदरपणात पूर्ण विश्रांती असल्यामुळे मंत्रोपाय पूर्ण होऊ शकणे : माझी आई देवद आश्रमात रहात असल्याने तिने हा विषय परात्पर गुरु पांडे महाराज यांना सांगितला. तेव्हा त्यांनी माझ्यासाठी मंत्रोपाय दिले. त्या काळात माझ्या सासूबाई आणि जाऊबाई यांनी मला घरातील काही काम करू दिले नाही. त्यामुळे मी पूर्णपणे विश्रांती घेऊ शकले, तसेच सर्व मंत्रोपाय करू शकले. त्यामुळे त्याचा परिणामही पुष्कळच चांगला अनुभवायला मिळाला. हीसुद्धा परात्पर गुरु पांडे महाराज यांचीच कृपा होती.

आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या मंत्रोपचारांमुळे ‘ज्या प्रसुतीगृहात मी नाव नोंदवले होते, तेथील आधुनिक वैद्यांनीसुद्धा बाळाला ठेवण्याविषयी सकारात्मक निर्णय दिला’, असे मला वाटते.

इ. पोटात असतांना बाळाच्या दोन्ही किडनींना सूज आल्यामुळे त्याला लघवी होत नव्हती. मंत्रोपाय चालू झाल्यावर काही दिवसांनी ‘सोनोग्राफी’ केली, तेव्हा ‘रिपोर्ट’मध्ये सूज आहे, त्याच स्थितीत होती, वाढली नव्हती.

ई. बाळ पोटात असतांना पाचव्या मासांपासून ते जन्माला येईपर्यंत प्रत्येक ३ आठवड्यांनी ‘सोनोग्राफी’ करावी लागत होती. ‘आधीचे २ वेळा गर्भपात आणि ३ र्या वेळी अशी कठीण परिस्थिती’ यांमुळे मी पुष्कळ निराश झाले होते; पण केवळ परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपामुळे मला उत्साह वाटत होता.

उ. आठव्या मासात मी १० दिवसांसाठी देवद आश्रमात रहाण्यासाठी गेले होते. त्या वेळी मंत्रजप करतांना पोटात बाळाची हालचाल जाणवत असे. ‘जणू पोटातून बाळ मला साथ देत आहे’, असे जाणवायचे. ध्यानमंदिरात आरती करतांनाही बाळाची हालचाल जाणवत असे. ‘जणू ‘मीही आरती म्हणत आहे’, असे त्याला सांगायचे आहे’, असे मला वाटले.

ऊ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपातील एका मंत्रात ‘बाळ सूर्यासारखे तेजस्वी होवो’, अशा अर्थाचा मंत्रजप असल्याने बाळही तेजस्वी जन्मणे : परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेल्या मंत्रजपातील एका मंत्रात ‘बाळ सूर्यासारखे तेजस्वी होवो’, अशा अर्थाचा मंत्रजप होता. मलाही तसेच वाटायचे की, माझे बाळ तेजस्वी होणार आणि त्याप्रमाणे चि. दर्श जन्मला, तेव्हा तेजस्वी दिसत होता. तेव्हा मंत्रशक्तीतील सामर्थ्य अनुभवायला मिळाले.

ए. केवळ आणि केवळ परात्पर गुरु पांडे महाराज अन् प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) आशीर्वादाने मला पुत्ररत्न प्राप्त झाले. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.

ऐ. कृतज्ञता : चि. दर्शविषयी मला मंत्रोपचारांमुळे आलेल्या वरील अनुभूती परात्पर गुरु पांडे महाराज असतांना लिहून द्यायला हव्या होत्या. तरी आज दिनांकानुसार (३.३.२०२०) त्यांची पुण्यतिथी आहे; म्हणून ‘या दिवशी तरी लिहून देऊया’, या विचारांनी मी हे लिखाण त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. ‘माझे हे मनोगत त्यांच्या चरणी पोचणारच आहे’, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. कोटी कोटी कृतज्ञता !’

१ आ. बाळ जन्मल्यावर

१. बाळ पोटात असतांना त्याला लघवी न होण्याचा त्रास होता; परंतु त्याचा जन्म झाल्यावर त्याने लघवी केली, तेव्हा पुष्कळ कृतज्ञता वाटली.

२. बाळ आरंभीपासूनच दिवसा आणि रात्री शांतपणे झोपायचे. भूक लागली, तरच उठायचे.

३. झोपेत त्याने अनेक मुद्रा केल्याचे मी पाहिले आहे.

४. क्वचित प्रसंगी बाळ रडलेच, तर श्रीकृष्णाचा पाळणा म्हटल्यावर ते शांत होत असे. त्याला झोपवण्यासाठी त्याचे वडीलही पाळणा म्हणत असत.

५. दर्श ७ – ८ मासांचा होईपर्यंत मला तो श्रीकृष्णासारखाच भासत होता. त्या वर्षी गोकुळाष्टमीच्या दिवशी मी त्याला श्रीकृष्णाचा पोषाख परिधान केला होता. तेव्हा तो मला साक्षात् श्रीकृष्णासारखाच भासला. तेव्हा मला पुष्कळ आनंद जाणवत होता.

१. वय १ ते ४ वर्षे

१. चि. दर्श २ ते २.३० वर्षांचा असतांना एकदा माझा कान दुखत होता. मला त्या वेदना सहन होत नव्हत्या; म्हणून मी रडत होते. तेव्हा दर्शने माझे डोळे पुसून ‘‘तू का रडतेस ?’’ असे म्हणून मला प्रेमाने जवळ घेतले.

२. दर्श गणेशचतुर्थीच्या वेळी आरती करतांना तालात ढोल वाजवतो आणि तो टाळही ठेक्यात वाजवतो.

३. त्याच्या हातात पेन्सिल, चमचा इत्यादी कोणतीही वस्तू मिळाली की, तो लयीत ताल धरून त्या वस्तूने वाजवत रहातो. ‘त्याला संगीतातील ‘नाद’ याचे चांगले आकलन आहे’, असे जाणवते. त्याला हे उपजतच आहे.

४. दर्शला प्राण्यांची आवड आहे. तो कुत्र्याला, मांजराला, एक एक बिस्किट हाताने भरवतो. पोपटाला पेरू भरवतो. त्याला त्यांची भीती वाटत नाही.

५. तो खेळतांना श्री गणेशमूर्ती आणणे, त्याची स्थापना करणे, सजावट करणे, घरातील सर्वांना बोलावून आरती लावायला सांगणे इत्यादी कृती त्याच्या खेळण्यांसमवेत करत असे. आमच्या घरी श्री गणेशचतुर्थीला गणपति येतो, तेव्हा याचा खेळातील गणपतीही येतो.

६. त्याला गोड पदार्थ खायला आवडतात. त्याला शाकाहारी पदार्थ आवडतात. त्याला नवीन कपड्यांची हौस नाही. तो आपण त्याला जे कपडे घालू, ते आनंदाने घालून घेतो.

७. त्याला कुणाची ओळख लागत नाही. कुठे बाहेर जाऊ लागलो की, तो स्वतःहून इमारतीच्या पहारेकर्
याला नमस्कार करतो.

१ ई. चि. दर्शचे स्वभावदोष

१ ई १. दोष : हट्टी, एकलकोंडा, भित्रा, रागीट (३.३.२०२०)

२. सौ. प्रचीती संजय देशमुख (चि. दर्शची मोठी मावशी), सनातन संकुल, देवद, पनवेल.

अ. ‘लहान असतांना दर्श पाळण्यात एकटाच खेळत असे. माझे यजमान कार्यालयातून आले की, त्याला फिरायला घेऊन जायचे. दर्श एक मासाचा असतांना एकदा माझ्या यजमानांनी दर्शची मजा केली. कार्यालयातून घरी आल्यावर दर्शकडे न पहाता ते माझ्याशी बोलत बसले. दर्शच्या हे लक्षात आले. तेव्हा तो पाळण्यातून पाय बाहेर काढून पायांनी त्यांच्या हाताला स्पर्श करू लागला, तरीही माझ्या यजमानांनी त्याच्याकडे पाहिले नाही. तेव्हा शेवटी तो मोठ्याने (भोकाड पसरून) रडू लागला. यजमानांनी त्याला घेतल्यावरच तो शांत झाला. तेव्हा ‘जणू त्या दोघांची पूर्वजन्मीची ओळख असावी’, असे मला वाटले. तेव्हा एक मासाच्या बालकाने ‘समोरच्या व्यक्तीला ओळखणे’, हे पाहून मला फारच कुतूहल वाटले.

आ. तो जसजसा मोठा होऊ लागला, तसतसा ‘जय भवानी’ ‘जय शिवाजी’, अशा घोषणाही देऊ लागला. ‘जय गुरुदेव’ असा जयघोषही करू लागला.’

३. कु. प्रतीक्षा सखाराम कोरगावकर (चि. दर्शची लहान मावशी), नगर

अ. दर्श रडायला लागल्यावर त्याची आई रामरक्षा लावते. तेव्हा तो लगेच शांत होतो.

आ. त्याच्या कानाजवळ नामजप म्हटला की, तो नामजप मन लावून ऐकतो.

इ. त्याला घरी गादीवर वा अन्य ठिकाणी पसारा दिसल्यास तो त्या वस्तू आईकडे आणून देतो किंवा घरात त्याचे बाबा, आजी आणि आजोबा यांना उचलायला लावतो.

ई. घरी नवीन कुणी आल्यास तो त्यांच्या पायांवर डोके ठेवून त्यांना नमस्कार करतो.

उ. त्याची निरीक्षणक्षमता, स्मरणशक्ती चांगली आहे. आमची आणि त्याची वर्षातून एकदाच भेट होते; पण मला तो लगेच ओळखतो. तो ‘आम्ही आश्रमातून आलो आहोत’, हे लगेच ओळखतो.

ऊ. एकदा मी त्याला भेटायला त्याच्याकडे गेले होते. तिथे मी त्याला ‘भ्रमणभाष’वर माझ्या आईच्या ६८ व्या वाढदिवसाचा (वर्ष २०१९) ‘व्हिडिओ’ दाखवला. त्यात ‘आई पहिला संस्कार’ या गाण्यावर रचना केलेले आईची वेगवेगळी छायाचित्रे होती. ते बघता बघता दर्श हमसाहमशी रडू लागला. त्या वेळी मला ‘नेमकी त्याची भावजागृती झाली कि त्याला सूक्ष्मातील काही कळले’, हे समजले नाही.’

४. श्रीमती प्रज्ञा सखाराम कोरगावकर (चि. दर्शची आजी, आईची आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल.

अ. ‘चि. दर्श ६ मासांचा असतांना सौ. पूर्णता त्याला आश्रमात घेऊन आली होती. तेव्हा मी स्वागतकक्षात सेवेसाठी बसले होते. ती पाय धुऊन आल्यावर त्याने हात जोडून नमस्कार केला. त्याला बघायला अवती-भोवती बरेच साधक जमले होते; पण त्याची दृष्टी केवळ माझ्याकडेच होती.

आ. ७.८.२०१७ या दिवशी रक्षाबंधन होते. मी माझ्या भावाकडे सौ. पूर्णताला आणि दर्शला घेऊन गेले होते. एका खासगी वाहनात आम्ही बसलो, तेव्हा तो एकदम रडायला लागला. मी लगेच श्रीकृष्णाचा नामजप लावला, तेव्हा तो शांत झाला आणि नामजप ऐकत झोपला.

इ. त्याच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी सौ. पूर्णता त्याला देवद आश्रमात घेऊन आली होती. आश्रमातील ध्यानमंदिरात त्याला घेऊन गेल्यावर त्याने देवतांसमोर लोटांगणच घातले आणि देवांना मिठीत घेण्यासाठी तो सरसावला. त्याला देवाधर्माची आवड आहे.

साधारणपणे पहिल्या वाढदिवसाला मुले रडतात. त्यांना ते सर्व नवीन असते; पण दर्श मोठ्या मुलांसारखे शांतपणे सर्व करू देत होता. त्यानंतर दुपारी महाप्रसादाला जाण्याच्या वेळी तो झोपला होता. तेव्हा मी त्याच्या कानात सांगितले, ‘‘दर्श, चल आपण आता महाप्रसाद घेऊया.’’ ते ऐकताच तो लगेच उठला आणि महाप्रसाद घ्यायला आला. एरव्ही त्याला झोपेतून उठवले, तर तो रडतो. इथे मात्र त्याने शांत राहून महाप्रसाद ग्रहण केला.

ई. १८.३.२०१८ या दिवशी माझे सौ. पूर्णताशी एका व्यावहारिक गोष्टीवरून बोलणे झाले. तेव्हा तिला त्याचे वाईट वाटून रडू आले होते. दर्शने आईला रडतांना पाहिल्यावर त्याच्या डोळ्यांत टचकन् पाणी आले.

उ. १८.९.२०१८ या दिवशी सौ. पूर्णताच्या नवीन घराचा गृहप्रवेश होता. तेव्हा मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांचा जीवनदशर्र्न ग्रंथ तिला भेट म्हणून घेऊन गेले होते. दर्श रडत असतांना त्याला तो जीवनदशर्र्न ग्रंथ दाखवला. तेव्हा तो एकाग्रतेने तो पाहू लागला.

ऊ. घरी कुणी दूरदर्शन संच (टी.व्ही.) लावला की, दर्श त्यांना दूरदर्शन बंद करून रामरक्षा, मारुतिस्तोत्र, देवाच्या आरत्या यांविषयीच्या ध्वनीचकत्या (सी.डी.) लावायला सांगतो.

ए. कधी घरात त्याच्या आई-बाबांमध्ये वाद झाला, तर ज्याचे चुकले असेल, त्याला तो गप्प बसायला सांगतो आणि क्षमा मागायला सांगतो किंवा नामजप लावण्यास सांगतो. ‘एवढ्या लहान वयात त्याला सर्व समजते’, असे दिसून येते.

ऐ. दिवाळीच्या वेळी फटाक्यांचा आवाज ऐकला की, तो कानांवर हात ठेवतो. त्याचप्रमाणे ध्वनीक्षेपकांवर कुणी मोठ्या आवाजात गाणी लावली की, तो कानांवर हात ठेवतो. त्याला तो आवाज, गोंगाट आणि गर्दी आवडत नाही, असे मला वाटते. गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर तो अस्वस्थ होतो. त्याला शांत ठिकाणी रहायला आवडते.

एकदा आम्ही एका विवाहाच्या कार्यक्रमानिमित्त गेलो असतांना तिथे अक्षतांऐवजी सर्वत्र गुलाबांच्या पाकळ्या पडल्या होत्या. तेव्हा दर्श त्या पाकळ्यांवर पाय न ठेवता, जेथे पाकळ्या नाहीत, अशा ठिकाणी पाय ठेवून चालत होता. यावरून ‘त्याला रज-तम वातावरण लक्षात येते’, असे वाटते.
​असा सात्त्विक नातू माझ्या पदरात घातल्याविषयी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’ (३.३.२०२०)

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ.
आठवले

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.