पुणे – मराठा ज्वेलर्सचे मालक बळवंत मराठे यांनी १५ डिसेंबर २०२० या दिवशी त्यांच्या दुकानांमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. व्यवसायातील मंदी आणि आर्थिक अडचणी यांमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे जबाबामध्ये नोंदवले होते; मात्र मराठे ज्वेलर्समध्ये गुंतवणूक केलेले पैसे परत मिळवण्यासाठी दीप्ती काळे आणि नीलेश शेलार हे मराठे यांच्या घरी येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करीत होते. कुटुंबाला रस्त्यावर आणण्याची, तसेच त्यांच्या मुलाचे बरेवाईट करण्याची धमकी देत होते. त्यांच्या या त्रासाला कंटाळून मराठे यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या पत्नी नीना मराठे यांनी केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर संबंधित दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.