बिहारचे किशनगंज येथील पोलीस अधिकारी अश्विनी कुमार यांची शेजारील बंगालच्या दिनाजपूर जिल्ह्यात धर्मांधांच्या जमावाने हत्या केली. ‘मॉब लिंचिंग’च्या या घटनेला आतापर्यंत कोणत्याच कथित सेक्युलरवादी, तुकडे तुकडे गँग, समाजवादी अथवा उदारमतवादी टोळीने विरोध केलेला नाही. एरव्ही कुणा पहलू खान अथवा अखलाख यांची हिंदूंच्या जमावाने कथित रूपाने हत्या केल्याच्या घटना घडल्यावर आकाशपाताळ एक करणारे आता मात्र व्यवस्थेतीलच एका अधिकार्याची, तेही जनतेच्या रक्षकाची दिवसाढवळ्या हत्या झाल्यावर मूग गिळून गप्प बसतात. यामुळे कोणत्याही राष्ट्रप्रेमीची तळपायाची आग मस्तकात गेल्यास आश्चर्य वाटणार नाही. अश्विनी कुमार यांच्या हत्येची बातमी ऐकताच त्यांच्या ७५ वर्षे वयाच्या आईला धक्का बसला आणि त्यातच त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ‘शांतीदूतां’वरील आक्रमणांच्या घटनांनी ज्यांच्या मनाला पाझर फुटते, तिथे हृदय हेलावणारी बंगालची ही घटना मात्र त्याच मनाला दगड बनवते !
‘शांतीदूतां’ची ‘अशांती’ !
‘शांतीदूतां’ची पोलिसांवर आक्रमण करण्याची ही काही पहिली वेळ नाही. वर्ष २००६ मध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत पोलीस ठाणे उभारण्यासाठी गेलेल्या गांगुर्डे आणि जगताप नावाच्या २ पोलीस हवालदारांना अशाच हिंसक ‘शांतीदूतां’नी जिवंत जाळले होते. बंगालच्याच मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे ३ जानेवारी २०१६ या दिवशी लाखो ‘शांतीदूतां’नी तेथील पोलीस ठाण्याला आग लावल्याची घटना अनेकांच्या स्मरणात असेल. एवढेच कशाला, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढत होता, तेव्हा कोरोना योद्धे म्हणून स्वत:च्या जिवाचा विचार न करता कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नरत असलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमणे केल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या.
अशा घटनांतून धर्मांधांच्या झुंडशाहीचा अनुभव नि जिहादी मानसिकता स्पष्ट होते; तसेच पोलिसांची अशा प्रसंगांच्या वेळी असलेली हतबलताही लक्षात येते. जनतेचे रक्षण करण्याचे दायित्व असलेली पोलीसयंत्रणा असुरक्षित असल्याचे हे चित्र देशासाठी लज्जास्पद आहे. यामागील कारणांचा विचार करणे आवश्यक आहे. पोलिसांची ही हतबलता आहे कि अकार्यक्षमता कि अजून काही, हे खरेतर पोलीसयंत्रणेने समोर येऊन स्पष्टपणे मांडले पाहिजे. आज अनेक राजकीय पक्ष शांतीदूतांच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शस्त्र न उगारण्याचा पोलिसांना आदेश असू शकतो, हे नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळेच या समाजाच्या बहुतांश पापांना झाकण्यात येते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. हे पूर्णपणे अनुचितच आहे; पण अधिक काळजी करायला लावणारी गोष्ट म्हणजे समाजाच्या रक्षणाचे दायित्व असलेल्या पोलिसांचा या धर्मांधांच्या हाती नाहक बळी जाणे होय. पोलीसयंत्रणेत फोफावलेला भ्रष्टाचार, तसेच ‘जनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक बनत चाललेले पोलीस’, अशी जी मानसिकता समाजमनावर अंकित झाली आहे, त्याला पोलीस उत्तरदायी आहेत आणि त्यांच्यावर ओढवलेल्या या नामुष्कीवर उपायही पोलिसांनीच योजणे आवश्यक आहे. हे जरी खरे असले, तरी दुसर्या बाजूला पोलिसांवर अशा प्रकारे अल्पसंख्यांकांकडून होत असलेली आक्रमणे पहाता या आक्रमणांचा प्रतिकार करणेही तेवढेच आवश्यक आहे. आज पोलिसांच्या हाती शस्त्रे आहेत, सरकारी सुविधाही आहेत. आवश्यकता आहे, ती पोलीसयंत्रणेने एकसंधपणे धर्मांधांकडून होणार्या अत्याचारांच्या विरोधात जागृत होण्याची आणि स्वसंरक्षणार्थ कृती करण्याची ! कारण जर पोलीस सुरक्षित राहिले, तर ते देशाचे नि जनतेचे रक्षण करू शकतील. यासमवेतच शस्त्र उगारणार्या धर्मांधांवर आक्रमण न करण्याचा सल्ला देणार्या प्रशासकीय बाबूंना आणि मंत्र्यांना तत्त्वनिष्ठपणे योग्य समजही दिली पाहिजे. समाजाचे हित चिंतणार्या प्रत्येक समाजघटकाला पोलिसांनी अशा प्रकारे प्रयत्न करणेच हितावह वाटते. आज भारतभर धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमणे होत असतांना त्यावर केंद्र स्तरावरही कठोर उपाययोजना काढणे अपेक्षित होते; मात्र दुर्दैवाने हा विषय राष्ट्रीय स्तरावर गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आक्रमक धर्मांधांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने पोलिसांना अधिक अधिकार देऊन त्यांच्या विरोधात कठोर धोरण अवलंबण्याचे आदेश देणे अपेक्षित आहे.
‘जिहादी’ भोंगे !
बिहारचे पोलीस अधिकारी अश्विनी कुमार यांच्या हत्येच्या संदर्भात आणखी एक गंभीर गोष्टही समोर आली आहे. एका दुचाकी वाहनाच्या चोरीच्या अन्वेषणासाठी कुमार बिहार आणि बंगाल यांच्या सीमेवर असलेल्या बंगालमधील पंतपुरा गावात गेले होते. महंमद नावाच्या एका धर्मांधाच्या घरी ते धाड टाकण्यासाठी गेले असता स्थानिक धर्मांधांना भडकावण्यासाठी नि कुमार यांना मारण्यासाठी महंमद आणि त्याचे पिता यांनी जवळच्याच मशिदीच्या ध्वनिक्षेपकावरून घोषणा देण्यास आरंभ केला. प्रार्थनास्थळातील ध्वनिक्षेपकाचा उपयोग हिंसा भडकावण्यासाठी करण्यात आला आणि यातूनच कुमार यांचा दुर्दैवी ‘जिहादी’ अंत झाला.
एका धार्मिक स्थळावरून अशा प्रकारे लोकांना भडकावण्याची ही काही पहिली वेळ नाही. वर्ष १९९० मध्ये लाखो काश्मिरी हिंदूंचा जो वंशविच्छेद करण्यात आला, त्या वेळी काश्मीरमधील १ सहस्र १०० मशिदींमधून एकच घोषणा देण्यात आली – ‘रलीव’, ‘सालीव’ आणि ‘गलीव’ म्हणजेच अनुक्रमे ‘इस्लाम स्वीकारा’, ‘काश्मीर सोडून जा’ अथवा ‘मरायला सिद्ध व्हा’ ! यातून प्रार्थनास्थळांमधून देण्यात येणार्या अशा प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा किती भयावह आहेत, याचा प्रत्यय येतो. भोंगे हटवण्याची मागणी झाल्यावर धर्मांधांकडून त्याचा नेहमीच विरोध होतो. त्यामागील कारण समजून घ्या. या भोंग्यांचा वापर धर्मांध समाजविघातक कारवायांसाठी होतो, हे आता सिद्ध झाले आहे. एकाच वेळी सहस्रो धर्मांधांचा जमाव जमवायचा असेल, त्यांना चिथावण्यासाठी किंवा त्यांना निरोप देण्यासाठी या भोंग्यांचा वापर होतो. हे ‘जिहादी’ भोंगे धर्मांधांच्या संपर्कयंत्रणेचा एक भाग बनले आहेत. त्यामुळे भोंगेच काढले, तर धर्मांधांसाठी मोठे अडचणीचे होईल ! ही सर्व सूत्रे पहाता अशा प्रार्थनास्थळांमधून प्रसृत होणार्या विचारधारेशी दोन हात करण्याची आता वेळ आली आहे, हेही तितकेच खरे आहे. सरकारने यासाठी कठोर पावले उचलणे काळाची आवश्यकता असल्याचे लक्षात घ्यावे.