समजूतदारपणा, ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्ती, तसेच व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेली कु. स्वानंदी मांजरेकर !

समजूतदारपणा, ऐकण्याची आणि शिकण्याची वृत्ती, तसेच व्यष्टी साधनेचे गांभीर्य असलेली ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील कु. स्वानंदी मांजरेकर (वय ११ वर्षे) ! 

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. स्वानंदी मांजरेकर एक आहे !

(‘२०१८ मध्ये कु. स्वानंदी मांजरेकर हिची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के होती.’ – संकलक)

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. स्वानंदी मांजरेकर

डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील कु. स्वानंदी मांजरेकर हिची तिची आई सौ. मंजिरी मांजरेकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. घरातील कामे शिकून घेणे

‘स्वानंदी दळणवळण बंदीच्या काळात घरात असल्यामुळे तिने घरातील कामे शिकून घेतली, उदा. धुलाईयंत्रात कपडे धुणे, ते वाळत घालणे, रात्री सुकलेले कपडे घड्या करून कपाटात ठेवणे. या समवेत ती मला स्वयंपाकघरातही साहाय्य करते.

२. लहान बहिणीला सांभाळणे

घरात मी किंवा तिची आजी व्यस्त असतांना ती आपल्या लहान बहिणीला (निर्मयीला) सांभाळते. निर्मयीला सांभाळतांना ती ‘हा आमचा कृष्णबाप्पा आहे’, असे म्हणते.

३. स्वावलंबी बनणे

जून २०१९ ते सप्टेंबर २०१९ मध्ये मी प्रसूतीसाठी जळगाव येथे गेले होते. तेव्हा ती ४ मास माझ्याविना तिच्या आजीच्या समवेत राहिली. या काळात तिला तिचे शाळेचे काही प्रकल्प सिद्ध करून द्यायचे होते. ते तिने इतरांचे साहाय्य घेऊन पूर्ण केले. मी नव्हते आणि तिचे बाबाही कार्यालयात व्यस्त असल्यामुळे तिने या ४ मासांत शाळेचा सर्व अभ्यास स्वतःच पूर्ण केला. या काळात ती स्वावलंबी बनली.

४. समजूतदारपणा

मी जळगावला असतांना तिला माझ्याकडे यावेसे वाटायचे; म्हणून ती रडायची. तेव्हा तिला भ्रमणभाषवर समजावून सांगितल्यावर ती लगेच शांत व्हायची.

५. ऐकण्याची वृत्ती

एकदा ती दूरचित्रवाहिनीवर चित्रपटातील गाणी ऐकत होती. त्या वेळी मी तिला ‘हे ऐकणे आणि बघणे कसे चुकीचे आहे’, हे समजावून सांगितले. तेव्हा तिने लगेच माझे ऐकले आणि त्यानंतर तिने कधीच गाणी लावली नाहीत.’

६. शिकण्याची वृत्ती

अ. तिची नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासा वाढली आहे. स्वानंदीला नृत्य आणि चित्रकला यांची आवड आहे. तिला नृत्याची शिकवणी लावली नसतांनाही ‘यू ट्यूब’वरील चित्रीकरण बघून ती नृत्य करण्याचा प्रयत्न करते.

आ. ती पोहायला शिकत होती. तेव्हा तिची मावशी आधीपासून पोहायला जात असल्यामुळे तिने तिच्या मावशीला ‘अजून चांगले कसे पोहायचे ?’ हे विचारून घेतले आणि तसे प्रयत्न केले.

७. आजीला सेवेमध्ये साहाय्य करणे

आजीला भ्रमणभाषमध्ये काही अडचण असेल, तर ती दूर करण्याचा प्रयत्न करते. आजीच्या सेवेचे काही लिखाण करून देणे, ‘व्हॉट्स अ‍ॅप’वर संदेश पाठवून संपर्क करणे आदी साहाय्य ती करत असते.

८. मोठ्या मुलींचे मायेतील बोलणे ऐकण्यापेक्षा लहान मुलींचे खेळ खेळायला आवडणे

आमच्या सदनिकेत ती खेळायला खाली जाते. तेव्हा ती तिच्या वयाच्या मुलींसमवेत न खेळता तिच्यापेक्षा लहान वयाच्या मुलींसमवेत खेळते. मी तिला याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘त्या मुली नुसत्या गप्पा मारत सदनिकेच्या आवारात फिरतात. मला ते आवडत नाही.’’ त्या वेळी माझ्या लक्षात आले की, मोठ्या मुली मायेतील विषय बोलतात, ते तिला आवडत नाही आणि लहान मुली अनेक खेळ खेळतात, ते तिला आवडते.

९. व्यष्टी साधना पूर्ण करून त्याचा आढावाही देणे

दळणवळण बंदीच्या काळामध्ये तिचे व्यष्टी साधनेचे गांभीर्य वाढले आहे. ती स्वतःहून व्यष्टी साधना करते आणि इतरांना आठवणही करून देते. ती चिंतन सारणीनुसार व्यष्टी साधनेचा आढावा तिच्या आजोबांना (श्री. दत्तात्रय वाघुळदे यांना) नियमित पाठवते.

१०. आई-वडिलांच्या साहाय्याने स्वभावदोषावर स्वतःच सूचना बनवून घेणे

ती ६ वीमध्ये असतांना एकदा तिने तिच्या स्वभावदोषावर स्वतःच सूचना बनवली. तिला आमच्या शेजारच्या मुलीचा पुष्कळ राग येत होता. तिचे त्या शेजारच्या मुलीशी काही केल्या पटत नव्हते. तिला समजावले असता तिने सांगितले, ‘‘मी काय करू ? मला संयमच ठेवता येत नाही.’’ मग तिने स्वतःहून आमचे साहाय्य घेऊन स्वयंसूचना बनवली आणि प्रतिदिन सत्र करायला आरंभ केला.

११. आधी तिला तिच्या चुका सांगितल्या की, राग यायचा; परंतु आता ती चुका मान्य करते.

१२. स्वानंदीचे स्वभावदोष

रागीटपणा, आळशीपणा आणि प्रतिमा जपणे’

– सौ. मंजिरी मांजरेकर, डोंबिवली, ठाणे. (२७.६.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक