भारताकडून कापूस आणि साखर निर्यात करण्याचा पाकचा निर्णय एका दिवसात मागे !

पाकशी व्यापार करण्यास भारतालाही इच्छा नाही. त्यामुळे पाकचा हा निर्णय म्हणजे सुंठी वाचून खोकला गेल्यासारखेच आहे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – देशातील धर्मांधांकडून आणि भारतविरोधी लोकांनी केलेल्या विरोधानंतर पाक सरकारने भारताकडून साखर आणि कापूस आयात करण्याचा निर्णय एका दिवसात मागे घेतला. पाकच्या मंत्रीमंडळाने आर्थिक समन्वय समितीने आयातीविषयीचा घेतलेला निर्णय रहित केला आहे.

३० जून २०२१ पासून पाक साखर आणि कापूस भारताकडून आयात करणार होता. वर्ष २०१६ मध्ये पाकने भारतातून साहित्य आयात करण्यावर बंदी घातली होती.