तळमळ वाढवून करूया आता चित्तशुद्धी ।
मग गुरुदेव अंतरी विराजमान होती ॥ १ ॥
सर्व साधकांकडे आहे हो लक्ष गुरुदेवांचे ।
कृष्णकन्हैया तुला किती सांगू रे गुण तयांचे ॥ २ ॥
गुरुकृपाच आहे ही भारी न्यारी ।
कृपाच आहे ही परम पूज्य (टीप) रूपातील अवताराची ॥ ३ ॥
गुरु अमुचे रक्षण करिती, जन्मोजन्मी समवेत असती ।
जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होण्याची गुरुकिल्ली देती ॥ ४ ॥
मृत्यूत्तर प्रवासातही ते समवेत असती ।
आहोत आम्ही भाग्यवान, असे गुरुदेव लाभती ॥ ५ ॥
सर्व जण त्यांसी ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक’ संबोधिती ।
सप्तलोक अन् सप्तपाताळ असे सर्वत्रच ते राज्य करिती ॥ ६ ॥
गुरुराया, शरण आम्ही साधकजन तव चरणी ।
साधक-फूल बनून राहूया हो आता श्री गुरुचरणी ॥ ७ ॥
टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले
– सौ. कोमल जोशी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.७.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |