पाकमध्ये हिंदु मुलींच्या बळजोरीने होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या हिंदु पत्रकाराची हत्या !

  • पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?
  • पाकमध्ये हिंदूंचा पद्धतशीरपणे वंशविच्छेद होत असतांना हे रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !
पत्रकार अजय लालवाणी

सुक्कुर (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील सुक्कुर शहरात हिंदु पत्रकार अजय लालवाणी यांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते केशकर्तनालयात केस कापून घेत असतांना त्यांच्यावर दुचाकीवरून आणि एका चारचाकीतून आलेल्या आक्रमणकर्त्यांनी गोळीबार केला.

 (सौजन्य : WION)

अजय लालवाणी येथील स्थानिक वृत्तवाहिनी आणि उर्दू दैनिक ‘पुचानो’मध्ये पत्रकार होते. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा अजय लालवाणी यांच्या वडिलांनी फेटाळून लावला आहे. लालवाणी हे सातत्याने हिंदु मुलींचे अपहरण करून त्यांचे बळजोरीने धर्मांतर करणार्‍या मौलवींच्या विरोधात आवाज उठवत होते. या हत्येनंतर पत्रकारांच्या संघटनेने निदर्शने केली. तसेच एक मोर्चाही काढण्यात आला.