मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसलो होतो. मी भावजागृतीसाठी प्रयत्न करत असतांना मनात कवितेचे शब्द येऊ लागले. माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्णाचे मुखमंडल आले आणि माझी भावजागृती झाली. त्या वेळी मला सुचलेल्या काव्यपंक्ती पुढे दिल्या आहेत.
अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।
या भावानेच जोडले जाते भगवंता तुझे नाव ॥ १ ॥
भावाच्या फुलांनी सजले मनाचे द्वार ।
नकारात्मक विचारांचा होई कमी भार ॥ २ ॥
भावातून सुचतात अनेक प्रार्थना ।
भगवंता, तुझ्याकडे लवकर येण्यासाठी होई याचना ॥ ३ ॥
भावातूनच अनुसंधान साधले जाते भगवंताचे ।
वाटते अनुसंधानात सतत भिजत रहायचे ॥ ४ ॥
भावातून साठतो मनात पाण्याचा झरा ।
भगवंताच्या आठवणीने डोळ्यांतून वाहू लागतात अश्रूंच्या धारा ॥ ५ ॥
भावातूनच भगवंता ओढ लागली तुझ्या प्राप्तीची ।
आणि लागली ओढ तुझ्या कोमल चरणांची ॥ ६ ॥
असाच प्रतिदिन भगवंता भावाचा झरा मनात साठू दे ।
भावाच्या साठ्यातून प्रत्येक क्षणी हे मन तुझ्याशी जोडले जाऊ दे ॥ ७ ॥
म्हणूनच भगवंता, अंतरीचा भाव घेई मनाचा ठाव ।
या भावानेच जोडले जाते भगवंता तुझे नाव ॥ ८ ॥
– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.१०.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |