लोकांनी थुंकू नये; म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा तात्काळ काढा ! – श्रीराम सेनेचे निवेदन

इमारतीचे मालक श्री. महेश बागेवाडी (डावीकडून दुसरे) यांना निवेदन देतांना राजू कोपर्डे (डावीकडून तिसरे) आणि अन्य

निपाणी – येथील एका इमारतीत असलेल्या कॅनरा बँकेच्या शाखेत जातांना जिन्यात लोकांनी थुंकू नये म्हणून हिंदु देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे देवतांची विटंबना होत आहे आणि समस्त हिंदु समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत. तरी देवतांच्या प्रतिमा असलेल्या फरशा तात्काळ काढून टाकाव्यात, या मागणीचे निवेदन श्रीराम सेनेचे निपाणी तालुकाप्रमुख श्री. राजू कोपर्डे यांनी दिले आहे. हे निवेदन या इमारतीचे मालक श्री. महेश बागेवाडी यांनी स्वीकारले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अभिनंदन भोसले, श्रीराम सेनेचे श्री. अमोल चेंडके, तसेच अन्य उपस्थित होते.