संपादकीय : भारतात मुसलमान बहुसंख्‍य झाल्‍यास…!

जगात आज ५७ ‘इस्‍लामी देश’ आहेत, तर १०० हून अधिक ‘ख्रिस्‍ती देश’ आहेत. ज्‍यूंचाही देश आहे, तर बौद्ध देशही आहेत. भारत बहुसंख्‍य हिंदूंचा देश असूनही ‘हिंदु राष्‍ट्र’ नाही. इस्‍लामचा जन्‍म १ सहस्र ४०० वर्षांपूर्वी झाला, तर ख्रिस्‍ती पंथ २ सहस्र वर्षांपूर्वी स्‍थापन झाला. सनातन हिंदु धर्माची उत्‍पत्ती अनादी आहे. त्‍यामुळे त्‍याची गणनाच होऊ शकत नाही. पूर्वी जगभर हिंदु धर्मच होता. त्‍यानंतर हे पंथ स्‍थापन झाले. तरीही आज पृथ्‍वीतलावर या सनातन हिंदु धर्मियांचा एकही अधिकृत देश नाही, ही लज्‍जास्‍पद स्‍थिती आहे. इतकेच नाही, तर हा बहुसंख्‍य हिंदू असणारा देशही इस्‍लामी आणि ख्रिस्‍ती राष्‍ट्र करण्‍याचे षड्‍यंत्र अनेक शतके चालू आहे. जिहाद्यांनी वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्‍लामी राष्‍ट्र करण्‍याचे ध्‍येय ठेवले आहे आणि ते त्‍या दिशेने प्रयत्न करत आहेत. आज भारतात ९ राज्‍यांमध्‍ये हिंदू अल्‍पसंख्‍य झाले आहेत. ज्‍या राज्‍यांत हिंदू बहुसंख्‍य आहेत, त्‍या राज्‍यांतील अनेक जिल्‍ह्यांमध्‍ये हिंदु अल्‍पसंख्‍य आहेत. अनेक ठिकाणांहून हिंदूंचे पलायन होत आहे. सध्‍या देशात उत्तरप्रदेशातील संभलचा विषय चालू आहे. त्‍या भागात पूर्वी म्‍हणजे काही दशकांपूर्वी हिंदू ५९ टक्‍के होते, तेथे आता हिंदू १५ टक्‍के राहिले आहेत. म्‍हणजे उत्तरप्रदेश हिंदू बहुसंख्‍य असणारे राज्‍य असले, तरी संभल येथे हिंदू अल्‍पसंख्‍य आहेत. भारतात ज्‍या भागांत हिंदू अल्‍पसंख्‍य झाले, तेथे त्‍यांना धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्‍ती मिशनरी यांच्‍यामुळे अल्‍पसंख्‍य व्‍हावे लागले आहे, हे सत्‍य आहे. ईशान्‍य भारतातील राज्‍यांत हिंदू अल्‍पसंख्‍य आहेत. भारताच्‍या स्‍वातंत्र्याच्‍या काळात तेथे हिंदू बहुसंख्‍य होते; मात्र गेल्‍या काही दशकांतच तेथे हिंदू अल्‍पसंख्‍य झाले आहेत. तेथे हिंदू केवळ नावालाच शेष आहेत. मणीपूरमध्‍ये गेल्‍या वर्षभरापासून हिंसाचार चालू आहे. तेथे ख्रिस्‍ती कुकी हिंदु मैतईंना लक्ष्य करत आहेत. या ख्रिस्‍त्‍यांना म्‍यानमारमधून शस्‍त्रपुरवठा केला जात आहे.

दुसरीकडे धर्मांध मुसलमान हिंदूंवर देशात सर्वत्रच अत्‍याचार करत असल्‍याच्‍या घटना प्रतिदिन समोर येत आहेत. काश्‍मीरमध्‍ये अल्‍पसंख्‍य असणारे हिंदू आता नामशेष झाले आहेत. काही दशकांपूर्वी तेथे एका रात्री हिंदूंना पलायन करण्‍यास भाग पाडण्‍यात आले. यावरून लक्षात येते की, भारत बहुसंख्‍य हिंदू असलेला देश असला, तरी एका रात्रीत तो अल्‍पसंख्‍य हिंदूंचा देश होऊ शकतो, हे नाकारता येणार नाही. ही स्‍थिती येण्‍यासाठी धर्मांध मुसलमान पद्धतशीरपणे प्रयत्न करत आहेत आणि याची कोणतीच जाणीव हिंदूंना नाही, ही अत्‍यंत दुःखाची गोष्‍ट आहे. भारतात हिंदूंच्‍या मोठमोठ्या संघटना आहेत, धार्मिक संस्‍था आहेत, अनेक मंदिरे आहेत. ‘तरीही हिंदूंच्‍या संदर्भात अशा घटना घडू शकणार आहेत, याची हिंदूंना जराही कल्‍पना नाही’, असे म्‍हटल्‍यास चुकीचे ठरू नये. ‘याला धर्मांध मुसलमान आणि ख्रिस्‍तीच पूर्णपणे उत्तरदायी आहेत’, असे म्‍हणणे योग्‍य ठरणार नाही, तर याला बहुसंख्‍य हिंदू, त्‍यांच्‍या संघटना, त्‍यांचे राजकीय पक्ष आणि त्‍यांचे नेते, हेही तितकेच उत्तरदायी आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. याचा सखोल अभ्‍यास केला, तर हे लक्षात येईल. उदाहरणार्थ देशात बंगाल, केरळ, तेलंगाणा आणि बिहार या राज्‍यांत हिंदूच शासनकर्ते सत्तेवर आहेत; मात्र त्‍यांची आणि तेथील नागरिक यांची मानसिकता पाहिल्‍यास ‘ही राज्‍ये भविष्‍यात मुसलमानबहुल झाली, तर आश्‍चर्य वाटणार नाही’, असे म्‍हणावे लागत आहे. त्‍यातल्‍यात्‍यात बंगाल राज्‍याविषयी थोडीफार माहिती लोकांना आहे. बंगालमध्‍ये ३३ टक्‍के मुसलमान आहेत. बंगालच्‍या बांगलादेश सीमेवरील जिल्‍ह्यांमध्‍ये मुसलमान बहुसंख्‍य आहेत, हे लक्षात घ्‍यायला हवे. येथील तृणमूल काँग्रेसच्‍या सरकारच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी मतांच्‍या लाचारीसाठी या धर्मांधांना पाठीशी घालण्‍याचे काम करत आहेत. हे धर्मांध घराघरांमध्‍ये गावठी बाँब बनवत आहेत. ‘त्‍यांचा वापर ते कुणाविरुद्ध आणि कधी करणार आहेत ?’, याचा विचार हिंदूंनी केला पाहिजे. त्‍यांच्‍यावर कारवाई केली जात नाही, हे लक्षात घ्‍यायला हवे. केरळमध्‍ये मल्लपूरम् हा मुसलमान जिल्‍हा असून तेथे जाण्‍यास पोलीसही घाबरतात. विशेष म्‍हणजे भारतात सहस्रो मोहल्ले आहेत, जेथे पोलीस आरोपींना पकडायला जाण्‍यास घाबरतात; कारण तेथे मुसलमान त्‍यांच्‍यावर आक्रमण करतात. बंगाल सरकारमधील मंत्री फिरहाद हकीम यांनी ‘लवकरच मुसलमान बहुसंख्‍य होणार आहेत. त्‍यानंतर त्‍यांना मागण्‍यांसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत’, असे उघडपणे म्‍हटले आहे. त्‍याला भाजप वगळता अन्‍य राजकीय पक्षांना विरोध केलेला नाही. यातून स्‍पष्‍ट होते की, . केरळमधील सरकार मुसलमानांना पाठीशी घालते. बिहारमध्‍येही याहून वेगळे काही घडत नाही. राजस्‍थानमध्‍ये काँग्रेसचे सरकार असतांना कन्‍हैयालाल यांचा उघडपणे शिरच्‍छेद करून त्‍याचा व्‍हिडिओ प्रसारित करण्‍यात आला. या सर्व घटना आणि स्‍थिती पहाता भारत पुढील काही वर्षेच ‘धर्मनिरपेक्ष देश’ राहील आणि हिंदू अल्‍पसंख्‍य होतील.

हिंदूंनी सरकारांवर दबाव निर्माण करणे आवश्‍यक !

‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्‍वास’ ही घोषणा सपशेल अपयशी ठरली आहे. आता ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागलो, तर मारले जाल) आणि ‘एक हैं तो सेफ हैं’ (संघटित राहिलो, तर सुरक्षित राहू) या घोषणा चालू केल्‍यापासून त्‍या हिंदूंनी स्‍वीकारल्‍या आहेत. या घोषणांमुळे काही राज्‍यांत भाजपला पुन्‍हा सत्ता मिळवता आली आहे, हे नाकारता येणार नाही. याचाच अर्थ ‘हिंदूंना विकास नाही, तर संरक्षण आवश्‍यक आहे’, असे यातून स्‍पष्‍ट होते. हिंदूंना त्‍यांच्‍या अस्‍तित्‍वाविषयीची जाणीव होऊ लागली आहे. भाजप सत्तेवर असतांना त्‍याच्‍या १० वर्षांच्‍या कालावधीत हिंदूंसाठी अधिक कार्य होणे हिंदूंना अपेक्षित होते; मात्र ते तितक्‍या प्रमाणात न झाल्‍यामुळे हिंदूंमध्‍ये अप्रसन्‍नता आहे. विधानसभा निवडणुकांमध्‍ये हिंदूंमधील संघटितपणा दिसून आला. हिंदूंनी आता विविध राज्‍यांमधील सरकारांवर दबाव निर्माण करून देव, देश आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी कार्य करून घेण्‍याची आवश्‍यकता आहे. देशात सर्वच जण योगी आदित्‍यनाथ यांच्‍याप्रमाणे स्‍वतःहून देव, देश आणि धर्म यांसाठी कार्य करतील, असे नाही. त्‍यामुळे हिंदूंनी अन्‍य सरकारांना योगी आदित्‍यनाथ यांच्‍याप्रमाणे देव, देश आणि धर्म यांचे कार्य करण्‍यासाठी बाध्‍य केले पाहिजे. हिंदूंनी संघटन करून हा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येणे अपरिहार्य आहे, अन्‍यथा पुढील ५ वर्षांनी हिंदूंच्‍या हाती काही लागलेले नसेल आणि हिंदूंचे पाय आणखी खोलात गेलेले असतील. बांगलादेशात हिंदूंची जी स्‍थिती झाली आहे, ती देशातील प्रत्‍येक मोहल्‍ल्‍यांमध्‍ये अल्‍पसंख्‍य हिंदूंची होत आहे. पुढे ती संपूर्ण देशात होईल. तिला सामोरे जाणे कठीण होईल.

हिंदूंनो, देव, देश आणि धर्म यांच्‍या रक्षणासाठी तुम्‍ही निवडून दिलेल्‍या सरकारवर संघटित होऊन दबाव निर्माण करा !