लग्नाला नकार दिल्याने युवतीला मुंबईमध्ये रेल्वेखाली ढकलणार्‍या युवकाला अटक

स्वार्थासाठी क्रौर्याच्या वाटेल त्या थराला जाणारी सध्याची तरुणाई !

मुंबई – लग्नाला नकार दिला म्हणून २१ वर्षीय युवतीला रेल्वेखाली ढकलणार्‍या सुमेध जाधव या युवकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. २० फेब्रुवारीच्या रात्री पश्‍चिम रेल्वेच्या खार रेल्वेस्थानकावर हा प्रकार घडला. यात युवतीच्या डोक्याला मार लागला आहे. सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे पोलिसांनी १२ घंट्यांमध्ये सुमेध जाधव याला अटक केली.