अरुण राठोड पोलिसांच्या कह्यात

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण

पुणे – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी अरुण राठोड यांना अटक केली आहे. पूजा चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर अरुण राठोड हे पसार झाले होते. या आत्महत्या प्रकरणात अरुण राठोड यांचे नाव समोर आले होते. सामाजिक प्रसारमाध्यमात अरुण राठोड आणि एक मंत्री यांच्या संवादातील ध्वनीफीत प्रसारित झाल्या होत्या. या आत्महत्या प्रकरणाशी अरुण यांचा काय संबंध आहे, याचे अन्वेषण करण्यात येत आहे.