कह्यात घेतलेल्या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी भुसावळ (जिल्हा जळगाव) येथे निवेदन !

शरजील उस्मानीचे वक्तव्य प्रकरण आणि देहली येथील हिंदुत्ववादी रिंकू शर्मा हत्या प्रकरण !

जळगाव, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – पुणे येथे ३१ जानेवारीला पार पडलेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी या धर्मांधाने ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला आहे’, असे धर्मद्रोही वक्तव्य करत हिंदु समाजाला हीन लेखण्याचा प्रयत्न केला असून शरजील उस्मानीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात यावा. तसेच देहली येथे १० फेब्रुवारी या दिवशी लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली. हिंदुत्ववादी रिंकू शर्मा यांची धर्मांधांच्या जमावाने घरात घुसून हत्या केली. शर्मा हे श्रीराम मंदिर निधी संकलनाचे कार्य करत होते. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या धर्मांधांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भुसावळ येथील समस्त हिंदुत्वनिष्ठांनी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्याकडे एका निवेदनादवारे केली आहे. या वेळी बजरंग दल जिल्हा विद्यार्थी प्रमुख श्री. प्रणव डोलारे, गोसेवा परिवाराचे श्री. रोहित महाले, श्री. राहुल बावस्कर, श्री. मनोज चौधरी, शिववंदना हिंदु संघटनेचे श्री. भूषण कोळी, श्री. रीतेश जैन, श्री. प्रविण भोई, श्री. संजू भोई, श्री. उमेश जोशी, श्री. अमित असोदेकर, श्री. भुषण महाजन, श्री. रोहन बरडे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांकडून निषेध !

शिवतीर्थावरील आंदोलनाला संबोधित करतांना हिंदु जनजागृती समितीचे (उजवीकडे) श्री. हेमंत सोनवणे

सातारा – येथील आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंदराव आफळे, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, सातारा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक मिलिंद गोसावी यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.