पर्यटनामुळे संस्कृतीचा विकास करणे, हे राष्ट्र्रीय धोरणावर अवलंबून असणे

‘पर्यटनामुळे संस्कृतीचा विकास होतो. नवनव्या विदेशातील लोकांना आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख होते. त्यांच्या मनावर संस्कृतीच्या मूल्यांचा संस्कार होण्यास साहाय्य होते आणि त्याद्वारे त्यांना योग्य ती प्रेरणा मिळण्याची संधी प्राप्त होत असते. याच माध्यमाद्वारे विदेशातील लोकांची संस्कृतीही आपल्यापर्यंत येऊन पोचते अन् आपणाशी त्यांचा संबंध सुधारू शकतो. आपल्या संस्कृतीचे लोण त्यांच्यामार्फत त्यांच्या देशापर्यंत जाऊन पोचू शकते; मात्र यासंदर्भात आपण जर गंभीर विचार केला नाही, तर या पर्यटनामुळे आपली संस्कृती, आपले संस्कार अगदी सहजगत्या पाश्‍चात्त्यांमुळे विकृत होऊ शकतात आणि आपला प्राचीन अमोल ठेवा नष्ट होऊ शकतो. याकडे जर व्यवस्थित लक्ष देण्यात आले, तर हेच पर्यटन आपल्या या थोर संस्कृतीची पाठशाळा बनू शकते. संस्कारांचे दीक्षा केंद्र बनू शकते. याचा आपण कसा आणि केव्हा उपयोग करून घेऊ शकतो ? हे पहाणे अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व काही आपल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्र्रीय धोरणावर अवलंबून आहे.

(संदर्भ : मासिक ‘अखंड ज्योती’, सप्टेंबर २०१२)