देशात गेल्यावर्षी बसले भूकंपाचे ९५६ धक्के !

नवी देहली – वर्ष २०२० मध्ये भारतात ९६५ वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. याचा अर्थ दिवसाला तीनवेळा असे धक्के बसले. यात १३ हून अधिक धक्के देहलीमध्ये जाणवले. यातील ३ धक्के तीव्रतेपेक्षा अधिक होते. नॅशनल सेंटर ऑफ सीस्मोलॉजीकडून (एन्.सी.एस्.कडून) ही आकडेवारी देण्यात आली आहे. या धक्क्यांमुळे कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. भविष्यातही धक्के बसत रहाण्याची शक्यता आहे. भूगर्भशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भूमीखालील ‘टेक्टोनिक प्लेट्स सरकत असल्याने हे धक्के जाणवत आहेत. अनेकदा अशा २ प्लेट्समध्ये निर्माण झालेल्या वायूचा दाब मोकळा होतो, तेव्हा असे धक्के बसतात. असे धक्के उन्हाळ्याच्या काळात जाणवत असतात.