कर्नाटकमध्ये पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा !

भाजपचा एस्.डी.पी.आय.वर आक्षेप !

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घोषणा देण्याचे कुणाचेही धाडस होणार नाही, असा वचक निर्माण केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीच्या वेळी पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. राज्यातील उजिरे येथे मतमोजणीच्या वेळी पाकिस्तानच्या समर्थनाच्या घोषणा देण्यात येत असल्याचे दिसत आहे. याविषयी पोलीस चौकशी करत आहेत.

 (सौजन्य : TIMES NOW)

भाजपने आरोप केला आहे की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एस्.डी.पी.आय.च्या) फेरीच्या वेळी या घोषणा देण्यात आल्या. याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. (केंद्रात आणि कर्नाटकात भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि एस्.डी.पी.आय. यांच्यावर बंदी घालण्यासाठी आणि त्यांच्या जिहादी नेत्यांवर कारवाई होण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे ! – संपादक)

एस्.डी.पी.आय.चे बेळ्तंगडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष हैदर अली यांनी हे आरोप फेटाळून लावले.