छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळामुळे नवीन पिढ्यांना ऊर्जा मिळेल ! – राजमाता कल्पनाराजे भोसले

राजमाता कल्पनाराजे भोसले

सातारा, १६ डिसेंबर (वार्ता.) – छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम अत्यंत उत्कृष्ट प्रतीचे झाले आहे. या समाधी स्थळामुळे नवीज पिढ्यांना ऊर्जा मिळत राहील, असे गौरवोद्गार राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी काढले. संगम माहुली (जिल्हा सातारा) येथे श्रीमंत छत्रपती शाहू (थोरले) महाराज यांच्या पुनर्निर्माण करण्यात आलेल्या समाधी स्थळाच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
राजमाता पुढे म्हणाल्या की, गत कित्येक पिढ्यांपासून समाधी स्थळ दुर्लक्षित होते. छत्रपती शाहूप्रेमी अजय जाधवराव आणि धीरेंद्र राजपुरोहित यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून मोठे कार्य केले आहे. परिसरातील ऐतिहासिक मंदिरे आणि समाधी यांचा जीर्णोद्धार झाल्यास पर्यटनाचा विकास होईल. सातारा शहर परिसरात शिवसृष्टी उभारण्याचा मानस असून त्याचा आराखडा सिद्ध करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. यासाठी समस्त सातारावासियांची साथ मिळणे आवश्यक आहे.