गुरुकृपायोगाची निर्मिती करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला अध्यात्मप्रसाराची सेवा मिळाली. त्या वेळी व्यवहारातील बर्याच व्यक्ती ‘जर-तर’ची भाषा वापरून साधनेविषयी ऐकण्याचे आणि कृती करण्याचे टाळत. पुढील काव्यात व्यवहारातील व्यक्तीचे विचार आणि त्यांवरील आध्यात्मिक दृष्टीकोन दिले आहेत.
जर पूर्ण होईल माझे काम, तर घेईन देवाचे नाम ।
जर घेशील नाम, तर कधीतरी गाठशील मोक्षाचे धाम ॥ १ ॥
जर मिळेल सवड, तर जाईन सत्संगाला ।
जर जाशील सत्संगाला,
तर पात्र होशील गुरूंच्या संकल्पाला (टीप १)॥ २ ॥
जर होत असेल कमाई, तर करीन सत्सेवा ।
जर करशील सत्सेवा, तर खाशील चैतन्याचा मेवा ॥ ३ ॥
जर मिळेल फुकाचे धन, तर करीन त्याग ।
जर सत्साठी करशील त्याग, तर सरतील भोग ॥ ४ ॥
जर कुणी येईल माझ्या कामी, तर त्यावरी करीन प्रीती ।
जर करशील प्रीती सर्वांवरी,
भगवंताचा हात राहील शिरी ॥ ५ ॥
‘जर-तर’ असती मनातील विकल्पाचे तरंग ।
त्यांतून बाहेर पडण्या,
गुरुचरणी भाव ठेवूनी करावा संकल्प ॥ ६ ॥
‘जर-तर’ला औषध नसते, जीव मायेतच गुरफटतसे ।
साधना करूनी, गुरुकृपा होऊनी,
आदिभ्रम (टीप २) जातसे ॥ ७ ॥
‘जर-तर’चा विचार मनी नसे, साधनेचा ध्यास लागतसे,
परम पूज्य (टीप ३) मला मोक्षाच्या वाटेने नेत असती ।
कृतज्ञतेचे शब्दपुष्प, मी परम पूज्यांच्या चरणी वहातसे ॥ ८ ॥
टीप १ – सत्संगामुळे आरंभी बुद्धीगम्य ज्ञान मिळते आणि पुढे गुरूंच्या मनात ‘शिष्याची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, असा संकल्प निर्माण होतो.
टीप २ – साधना केल्यावर ‘मी ब्रह्मापासून वेगळा नाही’, हे बुद्धीने कळते; मात्र त्याची अनुभूती येत नाही.
टीप ३ – परात्पर गुरु डॉ. आठवले
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |