कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मंत्री रोशन बेग यांना कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणात अटक

काँग्रेसचे भ्रष्टाचारी नेते !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील ‘आय-मॉनेटरी अ‍ॅडव्हायजरी’च्या (आय.एम्.ए.च्या) पोंजी योजनेतील घोटाळ्याच्या प्रकरणी सीबीआयने कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मंत्री रोशन बेग यांना अटक केली आहे.

त्यांना सीबीआयच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ठोस पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. कर्नाटकमधील आय.एम्.ए. आणि त्याच्या समूहातील आस्थापनांकडून चालवण्यात येणार्‍या पोंजी योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इस्लामी पद्धतीचा अवलंब करून त्या बदल्यात अधिक मोबदला देण्याचे आश्‍वास देऊन लाखो लोकांची फसवणूक करण्यात आली आहे.