१३ एप्रिल २०२० या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडाचा १०१ वा स्मृतीदिन आहे, त्या निमित्ताने…

असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारकांनी आजपर्यंत दिलेल्या क्र्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रांतीकारकांनी सशस्त्र आणि अत्याचारी राज्यकर्ते असलेल्या इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.

    वर्ष १९१९ मध्ये अमृतसर, पंजाब येथील जालियनवाला उद्यानात ब्रिटिशांच्या विरोधात असणार्‍या सभेला सहस्रो राष्ट्रप्रेमी एकत्र जमले होते. सभा चालू झाली आणि अचानक क्रूरकर्मा इंग्रज अधिकारी जनरल डायरने सैनिकांना गोळीबाराचे आदेश दिले. पटांगणाला चारही बाजूंनी भिंती होत्या. भारतियांनी अशा प्रकारे एकत्र येऊन क्रांती करू नये, या दुष्ट हेतूने डायरने २ सहस्र भारतियांचा भयंकर नरसंहार केला. या नरसंहाराच्या वेळेला ब्रिटिशांनी केलेल्या गोळीबाराच्या खुणा जालियनवाला उद्यानातील भिंतीवर अजूनही आहेत. त्या वेळी अनेक राष्ट्रप्रेमींनी ब्रिटिशांच्या हातून मृत्यू येऊ नये; म्हणून बागेतील विहिरीत आत्महत्या केल्या.

    जालियनवाला उद्यानातील रक्तरंजित इतिहासाचे
प्रत्येक भारतियाने स्मरण ठेवणे, ही काळाची नितांत आवश्यकता आहे !

अमृतसर, पंजाब येथील जालियनवाला उद्यान
जालियनवाला उद्यानात गोळीबाराच्या वेळी काही भारतियांनी या विहिरीत जिवाच्या आकांताने उड्या मारल्या !
जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी गोळीबार केला. त्याच्याखुणा भिंतीवर दिसत आहेत. (खुणा चौकोनात दाखवल्या आहेत.)
इंग्रजांनी या ठिकाणाहून गोळीबार केला