उत्तरप्रदेशातील बुलंदशहरामध्ये दळणवळण बंदी असतांना मशिदीमध्ये नमाजपठण

पोलिसांनी धाड टाकून २ मौलानांसह ५६ जणांना अटक; मौलानांची जामिनावर सुटका

  • असे केवळ उत्तरप्रदेशमध्येच घडू शकते ! उत्तरप्रदेश शासनाप्रमाणे अन्य राज्ये असे करण्याचे धाडस दाखवतील का ?
  • यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले की, नियम आणि राज्यघटना केवळ हिंदूंसाठीच आहेत. धर्मांध मात्र कायदे आणि नियम यांचे पालन न करता शरीयतचेच पालन करतात !

बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथील डीबाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील अमर हमजा मशीद आणि सराय मशीद या दोन्ही ठिकाणी मुसलमान गुप्तपणे नमाजपठण करण्यास जात होते. याविषयीची पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी या दोन्ही मशिदींमध्ये धाड घातली आणि तेथे असलेल्या २ मौलानांसह ५६ जणांना अटक केली. (आता कुठे आहेत सर्वधर्मसमभाववाले ? दळणवळण बंदी असतांना हिंदूंनी मंदिरामध्ये जर आरती केली असती, तर तथाकथित पुरो(अधो)गामी, प्रसिद्धीमाध्यमे आणि बुद्धीजीवी यांनी आकाश-पाताळ एक करत चर्चासत्रे आयोजित केली असती अन् हिंदूंच्या विरोधात रान उठवले असते ! याविषयी ते काही बोलणार का ? कि आताही ते त्यांची बाजू घेणार ? – संपादक) या सर्वांच्या विरोधात प्रथमदर्शी अहवाल प्रविष्ट करत गुन्हा नोंदवला आहे. न्यायालयाने त्या दोन्ही मौलानांना जामिनावर सोडले आहे.