देशभरात अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घाला ! – ‘निर्भया’च्या अधिवक्त्या सीमा समृद्धी कुशवाह यांची मागणी

या मागणीचा विचार करून प्रशासनाने अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालावी, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी !

नवी देहली – आज अगदी लहान मुलांच्या हातात भ्रमणभाष असून त्याचा कधीकधी गैरवापर केला जातो. देशभर अश्‍लील संकेतस्थळावर बंदी घालायला हवी. तसेच मुलांसाठी लैंगिक शिक्षण सक्तीचे केले पाहिजे. याचसमवेत पालकांनी मुलांशी मैत्री केली पाहिजे आणि प्रत्येकाकडून होणारा संकेतस्थळाचा गैरवापर रोखला पाहिजे, अशी मागणी ‘निर्भया’च्या अधिवक्त्या सीमा समृद्धी कुशवाह यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केली. या वेळी त्यांनी असेही सांगितले की, निर्भया प्रकरणाच्या अन्वेषणामध्ये आरोपींना अश्‍लील संकेतस्थळे पहाण्याचे व्यसन असल्याचे आढळून आले आहे.