काबूलमध्ये इस्लामिक स्टेटने गुरुद्वारावर केलेल्या आक्रमणात ११ जण ठार

  • ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सिद्ध करणारी घटना. वारंवार ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
  • पाकिस्तानची फूस असणारे खलिस्तानवादी शीख याविषयी काही बोलणार आहेत का ? कि त्यांना जिहादी आतंकवाद्यांकडून होणार्‍या त्यांच्या धर्मबांधवांच्या हत्या मान्य आहेत ?

काबूल (अफगाणिस्तान) – येथील गुरुद्वारावर इस्लामिक स्टेटच्या जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ११ जण ठार झाले, तर काही जण घायाळ झाले आहेत. या आक्रमणानंतर सुरक्षादलाच्या सैनिकांनी तेथे धाव घेऊन प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आणि गुरुद्वारामध्ये असलेल्या अनेकांचे प्राण वाचवले.

या आक्रमणाच्या वेळी गुरुद्वारामध्ये मोठ्या संख्येने शीख धर्मीय प्रार्थनेसाठी एकत्र आले होते. ‘हे आत्मघाती आक्रमण होते’, असे सांगण्यात येत आहे. येथील खासदार नरेंद्रसिंह खालसा यांनी सांगितले की, आक्रमणाच्या वेळी मी तेथे होतो. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर मी कसाबसा तेथून पळ काढल्याने बचावलो.