‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्‍यांच्या विरोधात उत्तरप्रदेश पोलिसांकडून सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल अशी कारवाई

‘मी समाजाचा शत्रू, घरात रहाणार नाही !’, असे फलक धरून काढले छायाचित्र

उत्तरप्रदेश शासनाप्रमाणे अन्य राज्यांनीही कारवाई करायला हवी. केवळ एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी दंडात्मक अथवा शिक्षेचीही कारवाई करायला हवी !

लक्ष्मणपुरी – देशातील विविध राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दळणवळणबंदी घोषित करण्यात आली आहे. असे असतांना अनेक नागरिक शासनाने दिलेल्या सूचना धुडकावून लावत रस्त्यावर फिरत आहेत. यावर उत्तरप्रदेश पोलिसांकडून ‘लॉकडाऊन’चे पालन न करणार्‍यांच्या विरोधात सामाजिकदृष्ट्या लाज वाटेल, अशा पद्धतीची कारवाई करण्यात येत आहे. येथील बरेलीमध्ये रस्त्यावर फिरणार्‍या तरुणांना पकडून पोलिसांनी त्यांच्या हातात ‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरात रहाणार नाही’, असे वाक्य लिहिलेला कागद दिला आणि त्यांची छायाचित्रे काढली. यानंतर पोलिसांनी संबंधित नागरिकांना ‘अत्यंत आवश्यक असेल, तरच घरातून बाहेर पडा अन्यथा घरात सुरक्षित रहा’ असा संदेश दिला.