संभाजीनगर येथे ‘सारी’ या व्याधीमुळे रुग्णाचा मृत्यू

सारी आणि कोरोना यांची लक्षणे समान असल्याचे मत

संभाजीनगर – येथील एका रुग्णाचे ‘सारी’ (सिव्हिअर अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) या व्याधीमुळे २४ मार्च या दिवशी निधन झाले. सारी आणि कोरोना यांची लक्षणे समान आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. सारीचे आणखी दोन रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. सारीच्या रुग्णाला एकदम सर्दी आणि ताप येतो. तापाचे प्रमाण जास्त असते. अशक्तपणा पुष्कळ येतो आणि रुग्णालयात भरती केल्यावर त्याला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्याविना पर्यायच नसतो, इतका हा आजार भयानक आहे. या रुग्णाचे २-३ दिवसांत निधन होऊ शकते, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पडळकर यांनी दिली आहे.