कोरोनाच्या नव्या अधिक घातक ‘ओमिक्रॉन’ प्रकारामुळे पुन्हा भीतीचे वातावरण !

भारताने १२ देशांतून येणार्‍या प्रवाशांना विमानतळांवर चाचणी करणे बंधनकारक केले आहे, तर अमेरिकेने दक्षिण आफ्रिका खंडातून येणार्‍या ८ देशांतील प्रवाशांना बंदी घालण्याची सिद्धता केली आहे.

जगातील ५३ देशांमध्ये निर्माण झाला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

युरोपमधील रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जर हे असेच चालू राहिले, तर फेब्रुवारीपर्यंत आणखी ५ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.

देशाची राजकीय महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी शत्रूदेशातील समाजाला लक्ष्य करणे हा शाश्वत पर्याय ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भविष्यातील युद्धनीती नागरिक केंद्रित असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ! असे बचावात्मक भूमिकेत राहण्यापेक्षा आक्रमणाचा पर्याय भारत कधी निवडणार ?

जागतिक आरोग्य संघटनेकडून मलेरियावरील पहिल्या लसीला संमती

जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधात्मक लस ‘आर्टीएस्, एस/एएस्०१’ला मान्यता दिली आहे. मलेरियामुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या आफ्रिकी देशांना प्रथम ही लस देण्यात येणार आहे.

वायू प्रदूषणाविषयी जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केली नवीन गुणवत्ता पातळी !

१००-१५० वर्षांपूर्वी जगात प्रदूषण नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती; मात्र विज्ञानामुळे आज पृथ्वी आणि पृथ्वीवरील जीव नामशेष होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे बुद्धीप्रामाण्यवादी आणि विज्ञानवादी कधी मान्य करणार ?

भारतातील कोरोना संपण्याच्या स्थितीत आला आहे ! – जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांचे मत

भारतातील कोरोना संपण्याच्या स्थितीत आला आहे. या टप्प्यावर अल्प किंवा मध्यम पातळीवर रोगाचा प्रसार चालू रहातो. लोक जेव्हा विषाणूशी जुळवून घेतात, त्या वेळी हा टप्पा येतो. साथीच्या टप्प्यापेक्षा हा टप्पा वेगळा असतो.

कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराचा जगातील १०४ देशांत फैलाव ! – जागतिक आरोग्य संघटना  

कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकाराचा जगातील जवळपास १०४ देशांमध्ये फैलाव झाला आहे आणि तो संपूर्ण जगात पसरू शकतो. कोरोनाचा हा प्रकार जगातील सर्वांत प्रबळ विषाणू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. ट्रेडोस घेब्रेसस यांनी दिली आहे.

दीर्घकाळ काम करणार्‍यांना हृदयविकार आणि स्ट्रोक यांचा अधिक धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

दीर्घकाळ काम करणार्‍या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आणि ‘स्ट्रोक’ यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने तिच्या अहवालात म्हटले आहे.