जगातील ५३ देशांमध्ये निर्माण झाला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका जगातील ५३ देशांमध्ये निर्माण झाला असून या देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी चेतावणी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हॅन्स क्लुज यांनी पत्रकारांना सांगितले की, युरोपमधील रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. जर हे असेच चालू राहिले, तर फेब्रुवारीपर्यंत आणखी ५ लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो. आपण या महामारीच्या उद्रेकाच्या एका गंभीर टप्प्यावर उभे आहोत. युरोप पुन्हा एकदा साथीच्या रोगाच्या केंद्रस्थानी आहे, जेथे आपण एक वर्षापूर्वी होतो. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय योग्य पद्धतीने न केल्याने आता ही ते पुन्हा वाढतो आहे. काही भागांत लसीकरणाचे प्रमाण अल्प असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.