पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेंस्की यांच्याशी संवाद !

युक्रेनमध्ये १८ सहस्र पैकी ७०० ते ८०० विद्यार्थी अजूनही अडकलेले आहेत. युद्धबंदी झाली, तरच त्यांना तेथून बाहेर येता येणार आहे. त्यासाठीच भारत या दोन देशांशी पुनःपुन्हा बोलणी करत आहे. महत्त्वाचे म्हणजे ते भारताचे ऐकून युद्धबंदी करत आहेत !

पुतिन संपूर्ण युक्रेन कधीही नियंत्रणात घेऊ शकणार नाहीत ! – जो बायडेन  

युद्धामुळे रशिया स्वतःची प्रगती नष्ट करत आहे. त्याला याची फार मोठे आर्थिक मूल्यदेखील मोजावे लागत आहे, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.

ब्रिटनच्या राणीच्या सुरक्षेतील ४ सैनिक युक्रेनमध्ये रशियाच्या विरोधात लढण्यासाठी गेल्याची शक्यता !

रशियाने या सैनिकांना पकडल्यास या युद्धात ब्रिटनचा सहभाग असल्यावरून रशियाकडून कारवाईची शक्यता !

तीन राष्ट्रप्रमुखांशी चर्चा केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा युद्ध रोखण्यास नकार  

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्टाली बेनेट, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोआन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा करून त्यांना युद्ध थांबवायला सांगण्याची विनंती केली होती.

युक्रेनमधील रशियन ऑर्थोडॉक्स चर्चकडून रशियाच्या सैन्याला साहाय्य !

युक्रेनविरुद्ध युद्ध लढण्यासह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचे ‘मदर रशिया’ धोरण लाभदायक ठरत असल्याचे दिसत आहे. या धोरणाद्वारे युक्रेनच्या अनेक शहरात रशियन ऑर्थोडॉक्स चर्चला स्वतःच्या बाजूने करण्यास पुतिन यशस्वी झाले आहेत.

युद्ध जिंकेपर्यंत मी राजधानी कीवमध्येच रहाणार !  

मी राजधानी कीवमध्येच आहे आणि कुणालाही घाबरत नाही. मी कोणत्याही छावणीत लपून बसलेलो नाही. हे युद्ध जिंकेपर्यंत मी राजधानी कीवमध्येच रहाणार आहे, असे प्रतिपादन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे केले.

पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी ३५ मिनिटे साधला संवाद !

या वेळी पंतप्रधान मोदी यांनी युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सरकारने केलेल्या साहाय्यासाठी झेलेंस्की यांचे आभार मानले.

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू ! – पुतिन

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तरच युक्रेनवरील सैनिकी कारवाई थांबवू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी सांगितले. रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी युक्रेनवर आक्रमण चालू केले होते.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात रशियाच्या विरोधातील युक्रेनच्या याचिकेवर सुनावणी

युक्रेनने रशियावर नरसंहार केल्याचा आरोप केला आहे. न्यायालय या प्रकरणी चौकशी करून यावर निर्णय देणार आहे.

भारताने रशियाला युद्ध थांबवायला सांगावे ! – युक्रेनची पंतप्रधान मोदी यांना विनंती

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना ‘युद्ध कोणत्याही देशाच्या हिताचे नाही’, असे समजावून सांगा, अशी मागणी युक्रेनचे परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.