पुतिन संपूर्ण युक्रेन कधीही नियंत्रणात घेऊ शकणार नाहीत ! – जो बायडेन  

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (डावीकडे) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (उजवीकडे)

वॉशिंग्टन (अमेरिका) – युद्धामुळे रशिया स्वतःची प्रगती नष्ट करत आहे. त्याला याची फार मोठे आर्थिक मूल्यदेखील मोजावे लागत आहे; परंतु युद्ध कितीही काळ चालू राहिले, तरी युक्रेनमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन कधीच विजयी होऊ शकणार नाहीत. पुतिन एखादे शहर नियंत्रणात घेऊ शकतील; परंतु ते कधीही संपूर्ण युक्रेन नियंत्रणात घेऊ शकणार नाहीत, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.