माझ्या भीतीमुळे रशिया युक्रेनवर आक्रमण करू शकला नव्हता ! – डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

माझ्या राजवटीतही पुतिन युक्रेनवर आक्रमण करण्याची सिद्धता करत होते; मात्र मी त्यांना रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बाँबस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पुतिन गप्प बसले, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

रशियावर घालण्यात आलेले निर्बंध युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहेत !  

पुतिन यांची पाश्‍चात्त्य देशांना चेतावणी !

रशिया ३ अटींवर युक्रेनशी चर्चा करण्यास सिद्ध !

पुतिन यांनी ‘युक्रेन हा तटस्थ आणि गैर-अणूऊर्जा देश असेल’, ‘क्रिमिया हा रशियाचाच भाग आहे, हे युक्रेनने मान्य करावे’ आणि ‘पूर्व युक्रेनच्या बंडखोर भागांचे स्वातंत्र्य मान्य केले जावे’, अशा ३ अटी ठेवल्या आहेत.

पुतिन यांना संपवणे, हे जगासाठी उत्तम काम ठरेल ! – अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम

जेव्हा पुतिन यांना संपवले जाईल. तुम्ही तुमच्या देशासाठी आणि जगासाठी उत्तम काम कराल, असे ट्वीट करत अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी पुतिन यांची हत्या करण्याची भाषा केली आहे.

युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दूरभाषवरून ९० मिनिटे चर्चा केल्यानंतर ‘युक्रेनमध्ये आणखी वाईट काळ येणार आहे,’ अशी चेतावणी दिली.

रशियाच्या सैनिकांचा खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर आक्रमण

युक्रेनमधील खारकीव आणि खेरसन येथे मध्यरात्री भीषण लढाई चालू होती. रशियाच्या सैनिकांनी खारकीवमधील सैन्य रुग्णालयावर ‘पॅराट्रूपर्स’ उतरवले आणि जोरदार आक्रमण केले.

अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

रशियाने युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धाची इतिहासामध्ये नोंद होईल. अमेरिका आणि ‘नाटो’ देश युक्रेनच्या एकेक इंच भूमीचे रक्षण करतील. पुतिन यांनी सध्या युद्धाच्या मैदानावर आघाडी मिळवली असली, तरी त्यांना याची किंमत चुकवावी लागेल.

पुतिन यांचे कुटुंब सायबेरियामधील छावणीत लपले !

रशियामधील ‘मॉस्को स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन’चे प्राध्यापक वालेरी सोलोवी यांच्या दाव्यानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाला सायबेरियामधील अल्ताई पर्वतांमध्ये असलेल्या छावणीमध्ये लपवले आहे.

तुम्ही आमच्या समवेत आहात, हे सिद्ध करा !

आम्ही आमची भूमी आणि स्वातंत्र्य यांच्यासाठी लढत आहोेत. आमची सर्व शहरे अद्यापही अजेय आहेत. कुणीही ती भेदू शकणार नाहीत. आम्ही भक्कम आहोत. युक्रेनचे मनोबल खचलेले नाही. आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढू.

भारताने अमेरिकेच्या ऐवजी रशियाला साहाय्य केल्याने भारतावर भविष्यात परिणाम काय होतील ?

‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदे’त अमेरिकेने एक विधेयक मांडले होते. तेव्हा भारताने रशियाला अप्रत्यक्ष सहकार्य केले. त्यामुळे रशियाचा निषेध करणारे हे विधेयक संमत होऊ शकले नाही. याचा भारतावर काय परिणाम होईल, याचे विश्लेषण पाहूया.