पंतप्रधान मोदी यांनी ‘ही युद्धाची वेळ नाही’, असे सांगणे अत्यंत योग्य !

ही सूड घेण्याची किंवा ‘पाश्‍चिमात्य विरुद्ध आशियाई देश’ असा विरोध करण्याची वेळ नाही. आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची हीच वेळ आहे, असे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.

उझबेकिस्तानमध्ये पंतप्रधान मोदी यांची पुतीन आणि एर्दोगन यांच्याशी भेट !

पंतप्रधान मोदी यांच्या पुतीन यांच्यासमवेतच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी रशिया-युक्रेन युद्ध, तसेच अन्नसुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा केली.

रशियन पत्रकार दर्या डुगिन हिची हत्या क्रूर आणि क्लेषदायी ! – पुतिन

पत्रकार दर्या ही पुतिन यांचे निकटवर्तीय सहकारी अ‍ॅलेक्सझँडर डुगिन यांची मुलगी होती.

आमच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी थेट रणांगणात उतरा ! – पुतिन यांचे पाश्‍चात्त्य देशांना आव्हान

आमच्याविरुद्ध युद्ध करण्यासाठी थेट रणांगणात उतरा, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्‍चात्त्य देशांना आव्हान दिले. मागील ४ मासांपासून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध चालू आहे.

रशिया-युक्रेन यांच्यातील युद्धात चर्चेच्या माध्यमातून उपाय काढण्याचा पंतप्रधान मोदी यांचा पुनरुच्चार

रशिया-युक्रेन युद्धासंदर्भात चर्चा आणि कूटनीती यांच्या माध्यमातून उपाय काढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रशियामध्ये भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्यासाठी पुतिन आणि मोदी यांच्यात चर्चा !

आम्ही भारताला तेलाचा विक्रमी पुरवठा केला आहे. आता आम्ही भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्याविषयी चर्चा करत आहोत, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले.

अमेरिका तिच्या मित्रपक्षांना गुलामासारखे वागवते ! – रशियाचे राष्ट्रपती पुतिन

‘अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांनी रशियाच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या लाभाचा आणि हानीचा विचार करावा’, असा सल्लाही पुतिन यांनी दिला आहे.

आफ्रिकन युनियनच्या प्रमुखांनी घेतली रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट !

रशिया-युक्रेन युद्धामुळे आफ्रिकेतील खाद्य संकट अधिक गंभीर होत असल्याचे दिसत आहे. अशा स्थितीत आफ्रिकेला रशियाकडून मोठ्या आशा आहेत, असे वक्तव्य आफ्रिकन युनियनचे अध्यक्ष तथा सेनेगलचे राष्ट्राध्यक्ष मॅकी सॉल यांनी केले.

व्लादिमिर पुतिन यांच्या मृत्यूच्या ब्रिटेनच्या दाव्याचे रशियाकडून खंडण

पुतिन यांची दृष्टी जात आहे. ते आणखी ३ वर्षे जिवंत राहू शकतात, असे डॉक्टरांनी सांगितल्याचा दावा एका रशियन गुप्तहेराने केल्याचे वृत्त ब्रिटनमधील ‘द इंडिपेंडंट’ने दिले आहे. त्याचेही रशियाने खंडण केले.

राष्ट्रहिताला प्राधान्य देत सर्बियाकडून रशियासमवेत नैसर्गिक वायूसंबंधी नवा करार !

सर्बियाचे राष्ट्राध्यक्ष ॲलेक्झँडर व्युसिक यांनी रशियासमवेत ३ वर्षांचा नैसर्गिक वायूसंबंधी करार केल्याचे घोषित केले आहे. त्यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी नुकतीच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये वायू कराराखेरीज अन्यही विषयांवर व्यापारासंबंधी विचार करण्यात आल्याचे व्युसिक यांनी सांगितले.