निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने निपाणी (कर्नाटक) येथे महारुद्र स्वाहाकारास प्रारंभ !

निपाणी भाग ब्राह्मण सभा यांच्या वतीने अधिक मासाच्या निमित्ताने ५ ते ७ ऑगस्ट या कालावधीत व्यंकटेश मंदिर, गांधी चौक येथे महारुद्र स्वाहाकार आयोजित करण्यात आला असून ५ ऑगस्टला त्याचा प्रारंभ झाला.

राहुल गांधींवर दखलपात्र गुन्‍हा नोंद करा ! – रणजित सावरकर यांची मागणी

राष्‍ट्रपुरुषांची अपकीर्ती आणि चारित्र्यहनन या आरोपांखाली राहुल गांधी आणि काँग्रेसचे महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांच्‍यावर कारवाई करण्‍यात यावी, अशी मागणी रणजित सावरकर यांनी तक्रारीत केली आहे.

…तर काँग्रेसने राहुल गांधी यांचाही निषेध केला पाहिजे ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

भिडेगुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरत आहेत, मग राहुल गांधी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अतिशय गलिच्छ विधाने करतात, त्याचाही काँग्रेसने निषेध केला पाहिजे.

वीर सावरकर उवाच

प्रभु श्रीरामांनी आपल्‍या पित्‍याच्‍या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्‍यासाठी मुख्‍यतः राज्‍य सोडून वनवास स्‍वीकारला. तेव्‍हा त्‍यांचे ते कृत्‍य महान होते.

वीर सावरकर उवाच

‘भारतावर आलेल्‍या परचक्रातून भारताचे राष्‍ट्रीय जीवन, म्‍हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आमच्‍या शत्रूंपैकी जे कुणी म्‍हणतात, त्‍यांचे ते म्‍हणणे मत्‍सराने आंधळ्‍या झालेल्‍या त्‍यांच्‍या दृष्‍टीला इतिहास सम्‍यक दृष्‍टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी !

‘राजस्थानमधील जयपूर येथे काँग्रेसने १२.१२.२०२१ या दिवशी महागाईविरुद्ध एका फेरीचे आयोजन केले होते; पण या फेरीत महागाईविरुद्ध बोलण्याऐवजी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जीभ नेहमीप्रमाणे हिंदूंविरुद्धच घसरली.

वीर सावरकर उवाच !

परधर्म ज्या वेळी आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागणारा असतो त्या वेळी परधर्माशी आपण सहिष्णुतेने वागणे, हा सदगुण ठरू शकतो. तथापि जो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत नाही, अशा परधर्मास परधर्म सहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही.

वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही.

भारतमातेचा ‘बॅरिस्टर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर !

१४ जुलै १९०९ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘बॅरिस्टर’ पदवी देण्याचे नाकारण्यात आले. त्याचे औचित्य साधून त्याविषयीच्या उपलब्ध असलेल्या माहितीला अनुसरून सावरकरांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या घटनांची माहिती ‘भारतमातेचा बॅरिस्टर’ या लेखस्वरूपात येथे मांडत आहे.

भारतमातेचा ‘बॅरिस्‍टर’ : स्‍वातंत्र्यवीर सावरकर !

१३ जुलै या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात ‘राष्‍ट्रभक्‍तीला सुरुंग लावण्‍यासाठी इंग्रजांनी रचले कटकारस्‍थान आणि क्रांतीकारकांची माहिती समजण्‍यासाठी इंग्रजांनी पाठवला घरभेदी’, यांविषयीची माहिती वाचली.