वीर सावरकर उवाच

‘हिंदु संस्‍कृतीने माणसाला देवत्‍वापर्यंत पोचण्‍याची आकांक्षा बाळगून माणसाने अंगात सात्त्विक भाव उत्‍पन्‍न करण्‍याची पराकाष्‍ठा केली पाहिजे’, अशी शिकवण दिली. तथापि हे जग केवळ सत्त्वाच्‍या एकाच धाग्‍याने विणले गेले नाही. ते  सत्त्व, रज आणि तम या ३ धाग्‍यांनी विणले गेले आहे. ज्‍याला या जगात जगायचे असेल, जिंकायचे असेल, कमीत कमी इतरांकडून, अन्‍यायाकडून पराभूत व्‍हायचे नसेल, तर त्‍याला सत्त्व, रज आणि तम या तिन्‍ही परिस्‍थितीतील अवस्‍थांना यशस्‍वीपणे तोंड देता येईल, असे त्रिशूली साधनच वापरले पाहिजे. म्‍हणून पात्रापात्र विवेक ही गीतेची शिकवण विसरता कामा नये.’

(साभार : ‘सहा सोनेरी पाने’, सोनेरी पान पाचवे-प्रकरण चौथे)